मराठी बातम्या  /  धर्म  /  Mother Teresa Jayanti : नैराश्य घालवून सकारात्मक व्हाल, मदर तेरेसांचे हे विचार फॉलो कराच

Mother Teresa Jayanti : नैराश्य घालवून सकारात्मक व्हाल, मदर तेरेसांचे हे विचार फॉलो कराच

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 26, 2023 07:37 AM IST

Mother Teresa Jayanti : संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देत मानवतेची सेवा करणाऱ्या थोर समाजसुधारक मदर तेरेसा यांची आज जयंती आहे. त्यामुळं त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात येत आहे.

Mother Teresa Jayanti
Mother Teresa Jayanti (HT)

Mother Teresa Marathi Quotes : संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देत मानवतेची सेवा करणाऱ्या थोर समाजसुधारक मदर तेरेसा यांची आज जयंती आहे. गरीब, वंचित, शोषित आणि असहाय लोकांच्या कल्याणासाठी मदत तेरेसा यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची केलं. युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा जगभरातील सर्वच खंड आणि देशांमध्ये जाऊन त्यांनी मानवतेची सेवा करण्याचं काम केलं. १९२९ साली मदर तेरेसा भारतात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आयुष्याची अनेक वर्ष भारतात घालवत भारतीयांची सेवा केली. त्यामुळं संपूर्ण जगात आज मदर तेरेसा यांचे विचार आणि त्यांच्या कार्यांना उजाळा देण्यात येत आहे.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना भारताचं नागरिकत्वही देण्यात आलं. याशिवाय १९८० साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्या आलं. मदर तेरेसा यांना जागतिक पातळीवर प्रतिष्ठेचा असलेल्या नोबेल पुरस्कारही देण्यात आला होता. मदर तेरेसा यांनी मानवतेची सेवा करत असताना गरिब आणि वंचित घटकांना प्रेरणा देण्याचं काम केलं. यावेळी त्यांचे अनेक विचार आजही लोकांना आयुष्यात काही तरी करून दाखवण्याची प्रेरणा देत असतात. त्यामुळं मदर तेरेसा यांचे असे कोणते विचार आहे, ज्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेरणा मिळू शकते?, जाणून घेऊयात.

१. ज्यावेळी आपण इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने प्रेमाची सुरुवात होत असते.

२. आयुष्यातील प्रत्येक कामात पारदर्शकता आणि सातत्य असायला हवं. कारण परिक्षा आणि निकाल यांना जोडणारे ते दोन पूल आहेत.

३. जर तुम्ही १०० लोकांना जेवण देऊ शकत नसाल तर एका व्यक्तीला पोटभर जेवू घालण्याचा प्रयत्न करा.

४. लोकं कसे आहेत, याचा विचार करू नका. असा विचार तुम्ही केला तर तुमच्याकडे प्रेम करायला वेळ नसेल.

५. तुम्ही ज्या लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करत आहात, त्यांना आधी तुम्ही प्रेम करायला हवं.

६. पैसे देऊन समाधानी होऊ नका, पैसे पुरेसे नाहीत. लोकांच्या समाधानासाठी झटणं महत्त्वाचं आहे. त्यांना तुमच्या प्रेमाची आवश्यकता आहे.

७. तुम्ही यशस्वी व्हावं, अशी देवाची अपेक्षा नाही. तर तुम्ही प्रयत्न करत रहावं अशी देवाची इच्छा असते.

८. तुमचं कुटुंब, घर, नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांशी प्रेमळपणे वागा. कारण दुसऱ्यांसाठी न जगलेलं जीवन हे जीवन नसतं.

WhatsApp channel