मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : वाढतं वय मनुष्याला 'या' एका गोष्टीची जाणीव करून देतं, असं का म्हणतात श्रीकृष्ण?

Geeta Updesh : वाढतं वय मनुष्याला 'या' एका गोष्टीची जाणीव करून देतं, असं का म्हणतात श्रीकृष्ण?

Aug 15, 2023, 04:27 AM IST

  • Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. 

गीता उपदेश (Pixabay)

Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात.

  • Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. 

महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपकी एक अर्जुनाला तेव्हा श्राकृष्णाने उपदेश केला, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला. अर्जुनाच्या मते समोर उभं ठाकलेलं ते विराट सैन्य आणि त्या सैन्यातले रथीमहारथी त्याचे काका,मामा,आजोबा, भाऊ होते. आपल्याच माणसांना मी कसा मारू शकतो? असा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि त्याने भर रणांगणात धनुष्य खाली ठेवलं.त्यानंतर अर्जुनाच्या सर्व शंकांना त्याचा सारथी आणि साक्षात परमेश्वर श्रीकृष्णाने उत्तरं दिली. यालाच गीता असं म्हटलं गेलं आहे. गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाहीत. तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलं आहे. मनुष्याने कशी कर्म करावी, कोणाशी कसं वागावं? याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं.

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

१८ अध्याय आणि सुमारे ७२० श्लोक गीतेत सांगण्यात आले आहेत. आज त्यातल्या काही उपदेशांना आपण पाहाणार आहोत.

काय म्हणतात श्रीकृष्ण?

गीतेनुसार, एखादी व्यक्ती जसजशी मोठी होत जाते, तसतसे त्याच्या लक्षात येते की ज्यांचे त्याच्या आयुष्यात कोणतेही योगदान नव्हते अशा लोकांना त्यांनी अनावश्यकपणे महत्त्व दिले आहे.

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणसाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. जेव्हा राग येतो, तेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवरील ताबा गमावते आणि रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी करते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात ज्यामुळे व्यक्तीला नंतर पश्चाताप होतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा.

श्रीमद भागवत गीतेनुसार प्रत्येक मानवाने आत्मनिरीक्षण केले पाहिजे. आत्मज्ञानानेच माणसाला त्याचे गुण-दोष कळतात. आत्मचिंतन माणसाला काय चूक आणि काय बरोबर हे ठरवण्यास मदत करते. म्हणूनच काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण करा.

श्रीकृष्णाच्या मते, एखाद्या व्यक्तीने स्वतःचे मूल्यांकन करणे देखील खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःशी संबंधित कोणताही निर्णय ठामपणे घेऊ शकणार नाही. जेव्हा माणसाला त्याचे गुण आणि उणीवा कळतात, तेव्हाच तो आपले व्यक्तिमत्त्व योग्य प्रकारे घडवू शकतो.

गीतेनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. मन खूप चंचल आहे आणि हेच आपल्या दु:खाचे कारण आहे. मनावर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती यशाच्या मार्गावर चालते. अशी व्यक्ती केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि ध्येय सहज साध्य करते.

श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. त्यामुळे परिणामांचा विचार न करता केवळ कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या