मराठी बातम्या  /  धर्म  /  Hanuman Chalisa : दररोज हनुमान चालिसा पठण करा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आजारांपासून मुक्ती मिळेल

Hanuman Chalisa : दररोज हनुमान चालिसा पठण करा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आजारांपासून मुक्ती मिळेल

Mar 19, 2024, 02:05 PM IST

    • Hanuman Chalisa Pathan Benefits : दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला राम भक्त हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारे मोठे संकटही दूर होते.
Hanuman Chalisa Benefits (PTI)

Hanuman Chalisa Pathan Benefits : दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला राम भक्त हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारे मोठे संकटही दूर होते.

    • Hanuman Chalisa Pathan Benefits : दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला राम भक्त हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारे मोठे संकटही दूर होते.

Hanuman Chalisa : हिंदू धर्मात बजरंगबली हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मंगळवार हा भगवान श्री रामाचेा महान भक्त हनुमानजींना समर्पित मानला जातो. हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात. अशा स्थितीत त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. तसेच, रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनात प्रचंड लाभ मिळू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

प्रत्येक संकट दूर होते

दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला राम भक्त हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारे मोठे संकटही दूर होते. याशिवाय असे मानले जाते की हनुमान चालिसाचे रोज पठण केल्याने कुंडलीतील राहू आणि केतू दोषांसह मंगळ दोषापासून मुक्ती मिळते.

इच्छा पूर्ण होतात

हनुमान चालिसामध्ये वर्णन केल्याप्रमाणे, अष्ट सिद्धी आणि नवनिधी देणारे हनुमान जी व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात. अशा स्थितीत जो व्यक्ती नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करतो, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

आजारांपासून मुक्ती मिळेल

जे लोक नेहमी आजारी राहतात, त्यांनी हनुमान चालिसाचे नियमित पठण करावे. यामुळे तब्येतीत सुधारणा होण्यास मदत होते. अनेकांना रात्री नीट झोप येत नाही, यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.

अशा परिस्थितीत, दररोज हनुमान चालिसाचा पाठ करणे त्या लोकांसाठी एक उत्तम उपाय असेल. कारण हनुमान चालिसाचा पाठ केल्याने माणसाला मानसिक शांती मिळते. त्यामुळे चांगली झोप लागते आणि आरोग्यही चांगले राहते.

 

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या