मराठी बातम्या  /  धर्म  /  Holi 2024 : होळीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही दान करू नका, अन्यथा तिजोरी रिकामी होईल

Holi 2024 : होळीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही दान करू नका, अन्यथा तिजोरी रिकामी होईल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 18, 2024 03:57 PM IST

Holi 2024 : होळीच्या दिवशी लोक शुभ फळ मिळविण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात, पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निषिद्ध आहे.

Holi 2024 : होळीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही दान करू नका, अन्यथा तिजोरी रिकामी होईल
Holi 2024 : होळीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही दान करू नका, अन्यथा तिजोरी रिकामी होईल

होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा होळीचा सण २५ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. एकीकडे होळीमध्ये रंग आणि गुलाल खेळण्याची परंपरा असताना दुसरीकडे होलिका दहनाच्या दिवशी अनेक प्रकारचे ज्योतिषीय उपाय केले जातात. हे उपाय केल्याने जीवनात शुभ गोष्टी घडतात, अशी मान्यता आहे.

सोबतच लोक या दिवशी शुभ फळ मिळविण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात, पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निषिद्ध आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की होळीच्या कोणत्या गोष्टी दान देणे अशुभ मानले जाते.

होळीच्या दिवशी या वस्तू दान करू नका

वस्त्र दान - साधारणपणे वस्त्र दान करणे खूप चांगले मानले जाते, परंतु होलिका दहन आणि होळीच्या दिवशी कपडे अजिबात दान करू नये. ज्योतिष शास्त्रानुसार या दोन्ही दिवशी वस्त्र दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातून सुख, समृद्धी आणि शांती दूर होते. तसेच आयुष्यभर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

पैशांचे दान - होलिका दहन आणि होळीच्या दिवशी पैसे दान करू नयेत. असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. हे दान करणाऱ्यांना गरिबीला सामोरे जावे लागते, अशी मान्यता आहे. तसेच देवी लक्ष्मीचा कोप होतो. अशा स्थितीत या दिवशी चुकूनही पैसे दान करू नका.

लग्नाच्या वस्तूंचे दान - ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील वस्तू इतर कोणत्याही स्त्रीला दान करू नयेत. हे पतीसाठी खूप हानिकारक असू शकते. तसेच कुंडलीत शुक्राची स्थिती कमकुवत होते. त्यामुळे या दिवशी असे कोणतेच दान करू नका.

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग