मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Navy new chief : नौदलाचे नवे प्रमुख डीके त्रिपाठी आहेत कोण? 'या' खास युद्ध कौशल्यासाठी आहेत प्रसिद्ध

Indian Navy new chief : नौदलाचे नवे प्रमुख डीके त्रिपाठी आहेत कोण? 'या' खास युद्ध कौशल्यासाठी आहेत प्रसिद्ध

Apr 19, 2024, 01:56 PM IST

  • New Navy Chief Dinesh Kumar Tripathi : व्हाइस ॲडमिरल डीके त्रिपाठी यांची नौदलाचे नवे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. त्यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी झाला. तर १ जुलै १९८५ रोजी ते नौदलात रुजू झाले झालेत. दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेत्रात त्यांचे विशेष प्राविण्य मिळवले आहे.

नौदलाचे नवे प्रमुख डीके त्रिपाठी कोण आहेत? 'या' खास युद्ध कौशल्यासाठी आहेत प्रसिद्ध

New Navy Chief Dinesh Kumar Tripathi : व्हाइस ॲडमिरल डीके त्रिपाठी यांची नौदलाचे नवे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. त्यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी झाला. तर १ जुलै १९८५ रोजी ते नौदलात रुजू झाले झालेत. दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेत्रात त्यांचे विशेष प्राविण्य मिळवले आहे.

  • New Navy Chief Dinesh Kumar Tripathi : व्हाइस ॲडमिरल डीके त्रिपाठी यांची नौदलाचे नवे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. त्यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी झाला. तर १ जुलै १९८५ रोजी ते नौदलात रुजू झाले झालेत. दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेत्रात त्यांचे विशेष प्राविण्य मिळवले आहे.

Indian Navy New Chief : नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची भारतीय नौदल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्हाईस ॲडमिरल त्रिपाठी ३० एप्रिल रोजी नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. तर सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार हे निवृत्त होत आहेत. सुमारे ४० वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात व्ही. ए. त्रिपाठी यांनी नौदलातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video : धावत्या कारमध्ये तरुणांनी बनवला मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ! पाहून अंगावर येईल काटा

Fact Check: : राहुल गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याची व्हायरल ऑडिओ क्लिप AI जनरेटेड

Viral News : टॅक्सी चालकाला हस्तमैथुन करताना पाहून घाबरली महिला; म्हणाली, 'त्याने माझ्यावर बलात्कार केला असता'

Covishield आणि Covaxinनं वाढवलं नवं टेंशन! वैयक्तिक माहितीवर सायबर चोरटे डल्ला मारण्याची शक्यता

Lok sabha Election 1 phase voting live: राज्यात सकाळी ११ पर्यंत १९ टक्के मतदानाची नोंद; भर उन्हात मतदारांचा उत्साह कायम

व्हाइस ॲडमिरल त्रिपाठी यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी झाला. ते १ जुलै १९९५ रोजी नौदलात नियुक्त झालेत. दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेत्रात त्रिपाठी यांचे विशेष प्राविण्य आहेत. त्यांनी आयएनएस विनाश, आयएनएस करची आणि आयएनएस त्रिशूल या युद्धनौकांचे नेतृत्व केले आहे. व्हाईस ॲडमिरल त्रिपाठी यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रदीर्घ सेवेबद्दल अति विशिष्ट सेवा पदक आणि नौदल पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Baramati murder : बारामती येथे जुन्या वादातून हत्याकांड! कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा खून

यापूर्वी दिनेश त्रिपाठी यांनी पश्चिम नौदल कमांडमध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता. विशेष बाब म्हणजे त्रिपाठी हे पद स्वीकारत आहेत, जेव्हा भारतीय नौदल अरबी समुद्रात हौथी बंडखोरांच्या वाढत्या कारवायांमध्ये मोठी भूमीका बजावत आहेत. तसेच समुद्री चाच्यांविरोधात देखील भारतीय नौदल मोठी भूमिका बजावत आहे. आतापर्यंत भारतीय युद्धनौकांनी अशा २० घटनांतुन अनेकांचे प्राण वाचवले आहे तसेच समुद्री चाचांना प्रत्युत्तर दिले आहे. इकडे चीनच्या हिंद महासगारात कुरापती वाढल्या आहेत. या साठी पाकिस्तानशी हातमिळवणीही करत असून ही बाब भारतासाठी चिंतेचा विषय आहे.

आधीच ३५० हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्या असलेला चीन वेगाने जहाज बांधणी करत आहे. याशिवाय तो अनेक सागरी मोहिमा देखील राबवत आहे. तसेच भारताला घेरण्यासाठी जिबूती, कराची आणि ग्वादर सारख्या बंदरांचा विकास देखील चीन करत आहे. त्रिपाठी यांच्यापुढे असलेलि ही मोठी आव्हाने आहेत.

विभाग

पुढील बातम्या