मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat : गुजरातमध्ये प्रचार संपला, उद्या ८९ जागांसाठी मतदान; पहिल्या टप्प्यात कोण मारणार बाजी?

Gujarat : गुजरातमध्ये प्रचार संपला, उद्या ८९ जागांसाठी मतदान; पहिल्या टप्प्यात कोण मारणार बाजी?

Nov 30, 2022, 08:09 AM IST

    • Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, आप आणि कॉंग्रेस पक्षाच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर आता उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे.
Gujarat Assembly Elections 2022 (HT)

Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, आप आणि कॉंग्रेस पक्षाच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर आता उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे.

    • Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, आप आणि कॉंग्रेस पक्षाच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर आता उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे.

Gujarat Assembly Elections 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपला असून आता उद्या तब्बल ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळं आता भाजप, आप आणि कॉंग्रेस अशा तिन्ही पक्षांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. गुजरात विधानसभेत एकूण १८३ जागा आहेत. त्यासाठी उद्या ८९ जागांवर आणि पाच डिसेंबरला ९३ जागांसाठी मतदान होईल. त्यानंतर आठ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बर्ड फ्लूचे संकट! केरळनंतर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, प्रत्येक जिल्ह्यातील पक्षांचे नमुने तपासणार

ट्रकच्या धडकेत नोटांच्या बंडलांनी भरलेला 'छोटा हत्ती' पलटला, रस्त्यावर पसरले ७ कोटींची रक्कम

Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

भाजपा गेल्या २७ वर्षातील सर्वात जास्त जागा घेत गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी केला आहे. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी गुजरातमध्ये भाजपशिवाय कोणताच पक्ष स्पर्धेत नसल्याचं म्हटलं आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही गुजरातच्या निवडणुकांमध्ये उडी घेतली असून त्यांनी गुजरातमध्ये सत्तांतर होऊन आपचं सरकार येणार असल्याचं लिखित पत्र (भविष्यवाणी) माध्यमांसमोर सादर केलं. तर दुसरीकडे कॉंग्रेसनंही गुजरातमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. गुजरातमध्ये बरीच वर्ष कॉंग्रेसला सत्ता मिळालेली नसली तरी पक्षाला नेहमीच ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळंच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे गुजरातमध्ये तळ ठोकून प्रचार करत आहेत.

पहिल्या टप्प्यातील मतदान कुठे होणार?

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील काही जिल्हे आहेत. त्यात राजकोट, सुरेंद्रनगर, कच्छ, मोरबी, जामनगर, द्वारका, पोरबंदर, गिर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोटाद, नर्मदा, भरूच, सूरत, तापी, डांग्स आणि नवसारी या जिल्ह्यांचा समावेश आहे. गुजरातमधील शहरी भागांमध्ये भाजपला नेहमीच मोठं यश मिळालेलं आहे. तर गुजरातचा ग्रामीण भाग हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. याशिवाय आता आम आदमी पार्टीनंही सौराष्ट्रवर लक्ष केंद्रीत केलं असून त्यामुळं आता मतदानाच्या पहिल्या टप्प्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचं लक्ष आहे.

गुजरातच्या सत्तेचं गणित काय?

गुजरातमध्ये कच्छ, सौराष्ट्र, उत्तर गुजरात, दक्षिण गुजरात आणि मध्य गुजरात असे पाच प्रशासकीय विभाग आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६१ जागा मध्य गुजरातमधून येतात. त्यानंतर सौराष्ट्रमधून ५४, दक्षिण गुजरातेतून ३५ आणि उत्तर गुजरातमधून ५४ आमदार निवडून येतात. याशिवाय गुजरातमध्ये ओबीसी मतदारांचं प्रमाण हे तब्बल ५२ टक्के इतकं आहे. त्यानतंर कोळी आणि ठाकूर या जातींचं प्राबल्य आहे. परंतु राज्यातील सत्तापदांच्या व्यवस्थेत पाटीदार समाजाचं मोठं वर्चस्व असल्यानं पाटीदार समाजाची निवडणुकीतील भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळं तिन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी या सर्व समाजघटकांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी रणनीती आखली आहे.

पुढील बातम्या