Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या एका प्रचारसभेत चक्क एक भलामोठा बैल घुसल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रचारसभेत घुसल्यानं भटक्या बैलानं कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही लोकांनी त्याला हाकलल्यानंतर बैल सभामंडपातून बाहेर पळाला. सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. मी लहानपणापासून पाहत आलो आहे की, कॉंग्रेसच्या मिटिंमध्ये उपद्रव करण्यासाठी भाजपचे लोक असंच करतात, असं म्हणत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेसच्या प्रचारसभेत भाजपनंच बैल घुसवल्याचा आरोप केला.