मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ShivSena Melava : बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंची भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका, म्हणाले..

ShivSena Melava : बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंची भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका, म्हणाले..

Jan 23, 2023, 08:03 PM IST

    • Thackeray Group Melava : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा घेत भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Thackeray Group Melava In Shanmukhananda Hall Mumbai (HT)

Thackeray Group Melava : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा घेत भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    • Thackeray Group Melava : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा घेत भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Thackeray Group Melava In Shanmukhananda Hall Mumbai : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारनं विधीमंडळात बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम सुरू असताना उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील कारभार, उद्योगधंदे आणि मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून भाजपसह शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवीवर भाजपची नजर आहे. जनतेच्या पैशांवर नजर ठेवाल तर तुमचं तोंड काळं करू, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुत्व सगळं थोतांड आहे, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असून हिंदुत्वाची भिंत उभी केली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला दमदाटी करत असताना आपले मुख्यमंत्री मात्र त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन जातायंत. फक्त उद्योगच नाही तर फिल्मसिटीही बाहेरच्या राज्यात नेली जात आहे, परंतु राज्याचे गद्दार मुख्यमंत्री त्यावर गप्प कसे बसू शकतात?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे.

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांचे वडील चोरतायंत. परंतु हे करत असताना त्यांनी स्वत:च्या वडिलांना विसरू नये म्हणजे झालं. बाळासाहेबांच्या फोटोशिवाय त्यांना मतं मिळू शकणार नाहीत. नाही तर त्यांनी निवडणुकीत मोदींचा फोटो लावावा आणि आम्ही बाळासाहेबांचा लावू, विधीमंडळात तैलचित्र लावताय अभिमानास्पद, पण तुमचा हेतू चुकीचा असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्री शरद पवार, नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांचं कौतुक करतात, त्यामुळं मला हे नेमके कुणाचे आहेत, असा प्रश्न पडतो, असंही ठाकरे म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, या कोश्यारीनं छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांवर सातत्यानं वादग्रस्त वक्तव्ये केलीत, त्यांना महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे, असं म्हणत ठाकरेंनी कोश्यारींनाही जोरदार टोला हाणला आहे.

पुढील बातम्या