मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Building Collapsed : काही क्षणात तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त; जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO

Delhi Building Collapsed : काही क्षणात तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त; जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO

Apr 20, 2024, 08:18 PM IST

  • Delhi Building Collapsed : दिल्लीतील कल्याणपुरी परिसरातील ३ मजली इरारती काही सेकंदात कोसळली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले होते, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

दि्ल्लीत तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त

Delhi Building Collapsed : दिल्लीतील कल्याणपुरी परिसरातील ३ मजली इरारती काही सेकंदात कोसळली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले होते, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • Delhi Building Collapsed : दिल्लीतील कल्याणपुरी परिसरातील ३ मजली इरारती काही सेकंदात कोसळली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले होते, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

दिल्लीतील कल्याणपुरी परिसरात एक तीन मंजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, तीन मजली इमारत पाहता पाहता जमीनदोस्त होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक आसपास उभे असल्याचे दिसत आहे. जमीन कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. दरम्यान या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

ट्रेंडिंग न्यूज

बाप रे..! दोन बहिणी चालवत होत्या आंतरराज्य सेक्स रॅकेट, आसाममधून आणत होत्या मुली

Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kejriwal Gets Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

दिल्लीतील कल्याणपुरी येथे ही घटना घडली. या घटनेवेळी काही लोक तेथे उभे होते. तेथे उपस्थित लोकांनी याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतानाच तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली. घर कोसळल्यानंतर लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत. घर कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.

ही घटना दिल्लीतील कल्याणपुरीमधील ब्लॉक-११ मधील आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांनी दुपारी ४ वाजता इमारत कोसळत असल्याची माहिती मिळाली होती. बिल्डिंग कोसळण्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तेथे जमलेल्या लोकांनी दूर हटवले. यामुळे इमारत कोसळ्यानंतर कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी सतर्कता बागळगत घराच्या दोन्ही बाजुला बॅरिकेडिंग केली होती. इतके करूनही काही लोक बॅरिकेडिंग ओलांडून निघून गेले. जेव्हा इमारत कोसळली तेव्हा लोक त्याच्यापासून दूर पळताना दिसून आले.

याआधी मुंबईतील किल्ला भागातही एक घटना समोर आली होती. तेथे एक बिल्डिंग पाडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी एका बाल्कनीचा काही भाग कोसळला होता. यामध्ये तीन लोक जखमी झाले. घटनास्थली पोलिसांसोबत अग्निशमन दलाचे जवानही पोहोचले होते. दुर्घटनेतील एका जखमीला बॉम्बे रुग्णालयात दाखल केले तर दोन जखमींनी उपचार करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर आता दिल्लीतही तीन मजली इमारत कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

झाडांना मिठ्ठी मारायची आहे, तर मोजा १५०० रुपये -

बेंगळुरुमधील कब्बन पार्कमध्ये झाडांना मिठ्ठी मारण्यासाठी १५०० रुपये वसुली केल्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ट्रोव एक्सपीरियन्स नावाच्या कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर "फॉरेस्ट बाथिंग एक्सपीरियन्स" सुरू केला आहे. या कंपनीचे म्हणणे आहे की, वनांमध्ये हीलिंग शक्ती आहे. बेंगळुरुमधील कंपनीने याबाबत एक जाहिरात दिली आहे.

विभाग

पुढील बातम्या