मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धुळवडीनिमित्त राजनाथ सिंह विदेशी पाहुण्यांसोबत थिरकले; अमेरिकेच्या महिला मंत्र्याचा भन्नाट डान्स

धुळवडीनिमित्त राजनाथ सिंह विदेशी पाहुण्यांसोबत थिरकले; अमेरिकेच्या महिला मंत्र्याचा भन्नाट डान्स

Mar 08, 2023, 05:12 PM IST

    • Rajnath Singh Viral Video : संरक्षमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या महिला मंत्र्यासोबत भन्नाट डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Rajnath Singh Viral Video (HT)

Rajnath Singh Viral Video : संरक्षमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या महिला मंत्र्यासोबत भन्नाट डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    • Rajnath Singh Viral Video : संरक्षमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या महिला मंत्र्यासोबत भन्नाट डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rajnath Singh Viral Video : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. बॉलिवूड सेलेब्रिटी, क्रिकेटर्स आणि राजकारणी लोकांनीही आपल्या कुटुंबियांसोबत एकमेकांवर रंगांची उधळण करत धुळवडीचा आनंद घेतला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील याला अपवाद नाहीत. त्यांनी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी अमेरिकन पाहुण्यांबरोबर धुळवड साजरी केली आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी अमेरिकेतून आलेल्या शासकीय पाहुण्यांना रंग लावून धुळवड साजरी केली. याशिवाय डीजेच्या तालावर अमेरिकन वाणिज्यमंत्र्यांसोबत भन्नाट डान्सदेखील केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइनही मिळणार बाजारासारखी भाजी खरेदीची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी धुळवडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनीदेखील हजेरी लावली. परंतु अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जीना रायमोंडो या कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण ठरल्या. कारण पाहुण्यांना रंग लावल्यानंतर जीना रायमोंडो यांनी थेट राजनाथ सिंह यांच्यासोबत डान्स सुरू केला. त्यामुळं सुरुवातीला काहीसे अवघडलेल्या राजनाथ सिंह यांनी जीना रायमोंडो यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डान्स सुरू केला. त्यानंतर खु्द्द राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यामुळं आता त्यावरून युजर्सनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जीना रायमोंडो या गेल्या काही दिवसांपासून भारत दौऱ्यावर आलेल्या आहेत. भारत सरकारकडून त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. रायमोंडो यांनी दिल्लीतील निवासस्थानी धुळवडीसाठी हजेरी लावल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका युजरनं म्हटलं आहे की, अटलबिहारी वाजपेयी यांनी जी राजकीय संस्कृती निर्माण केली होती, त्याला आजचे भाजपा नेते पायदळी तुडवत आहे, तर दुसऱ्यानं अमेरिकन मंत्री भारतीय मंत्र्यासोबत नाचत आहे, ही तर मोठी कमाल असल्याचं म्हटलं आहे.

पुढील बातम्या