मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Lalu Yadav Party Rjd Priya Das From Sheikhpura Burnt Manusmriti Cooked Chicken And Smoked Cigarette

मनुस्मृतीची होळी करून सिगरेट पेटवली, नंतर चुलीत घालून चिकन बनवले; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल

मनुस्मृतीची होळी
मनुस्मृतीची होळी
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Mar 07, 2023 04:03 PM IST

मनुस्मृतीची होळी केल्याचा प्रकार बिहारमध्ये समोर आला आहे.ट्विटरवर हाव्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बिहारमध्ये रामचरितमानसचा वाद अजून थांबण्याची चिन्हे नसताना आता मनुस्मृतीची होळी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्विटरवर एकव्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक तरुणी मनुस्मृतीला आग लावून ती मातीच्या चुलीत घालते. त्यानंतर त्या चुलीवर चिकन बनवते. त्यानंतर जळत्या मनुस्मृतीने सिगरेट पेटवून ओढली. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी बिहारमधील शेखपुरा येथील राहणारी असून प्रिया दास असे तिचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी प्रिया दासने इंडिया टुडे बरोबर बोलताना सांगितले की, तिने ५०० रुपयात मनुस्मृती खरेदी केली होती. तिने सांगितले की, मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे की, जर महिला मद्यपान करत असेल तर तिला अनेक प्रकारचे दंड केले पाहिजेत. त्याचबरोबर न्याय करण्याच्या आधी संबंधित लोकांच्या जातीची माहिती करून घेण्याचे लिहिले आहे.

प्रिया दासने म्हटले की, मी नॉनव्हेज खात नाही तसेच सिगरेटही ओढत नाही. मात्र केवळ विरोध व्यक्त करण्यासाठी व्हिडिओमध्ये मनस्मृती जाळून चिकन बनवले. प्रिया दास लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीशी संबंधित आहे. तसेच ती पक्षाची महिला प्रदेश सचिव आहे.

प्रिया दासने म्हटले की, ही केवळ सुरुवात आहे. अशा पुस्तकांना नष्ट करायचे आहे. हे पुस्तक कोणत्याच प्रकारे योग्य नाही. अन्य कोणत्याही पुस्तकातून वाचकाला ज्ञान मिळते. मात्र हे पुस्तक जातिभेद, लिंगभेद व समाजाला विभाजित करण्याचे काम करते. अशा पुस्तकाला विरोध झालाच पाहिजे.

WhatsApp channel

विभाग