मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Prashant Kishore : ..तर राहुल गांधींनी राजकारणातून ब्रेक घ्यावा! प्रशांत किशोर यांनी दिले ४ मोलाचे सल्ले

Prashant Kishore : ..तर राहुल गांधींनी राजकारणातून ब्रेक घ्यावा! प्रशांत किशोर यांनी दिले ४ मोलाचे सल्ले

Apr 07, 2024, 10:15 PM IST

  • Prashant Kishore On Rahul Gandhi : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, गेल्या १० वर्षापासून राहुल गांधी एकच काम करत आहेत. त्यात यश मिळत नसेल तर त्यांनी राजकारणातून बाजुला व्हावे.

प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला

Prashant Kishore On Rahul Gandhi : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, गेल्या १० वर्षापासून राहुल गांधी एकच काम करत आहेत. त्यात यश मिळत नसेल तर त्यांनी राजकारणातून बाजुला व्हावे.

  • Prashant Kishore On Rahul Gandhi : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, गेल्या १० वर्षापासून राहुल गांधी एकच काम करत आहेत. त्यात यश मिळत नसेल तर त्यांनी राजकारणातून बाजुला व्हावे.

Lok Sabha Election: पॉलिटिकल स्ट्रेटजिस्ट प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राजकारणातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, मागील १० वर्षापासून ते एकच काम करत आहेत. अनेक अपयशानंतरही ते मागे हटत नाहीत व दुसऱ्यालाही पुढे येऊ देत नाहीत. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखातीत राहुल गांधींना काही सल्ले दिलेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

हिंदी पट्ट्यात पकड ढिल्ली होऊ देणे मोठी चूक -

प्रशांत किशोर यांनी म्हटले की, राहुल गांधी हिंदी पट्ट्यात निवडणूक जिंकू शकत नाहीत. तर वायनाडमधून जिंकल्याचा काहीच फायदा नाही. काँग्रेसची लढाई मुख्यरित्या उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या हिंदी भाषिक राज्यात आहे. मात्र त्यांचे नेते मणिपूर आणि मेघालयाचे दौरे करतात. केवळ केरळमध्ये जिंकून देशात विजय मिळवता येत नाही. राहुल गांधी यांनी अमेठी सोडणे देशातील जनतेला चुकीचा संदेश दिल्यासारखे आहे. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचे उदाहरण देत म्हटले की, पीएम मोदी २०२४ मध्ये गुजरातसोबतच उत्तर प्रदेशमधूनही निवडणूक लढले होते. 

काही वर्षे राजकारणातून ब्रेक घेण्याची गरज -

प्रशांत किशोर यांनी म्हटले की, राहुल गांधी मागील १० वर्षापासून एकच काम करत आहे. त्यात त्यांना यश मिळत नसेल तर ब्रेक घेण्यात काहीच वाईट नाही. तुम्ही दुसरे कोणाला तरी पाच वर्षे काम करू द्यावे. सोनिया गांधी यांनीही हे केले आहे. जेव्हा माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची हत्या झाली होती तेव्हा सोनिया गांधींनी १९९१ मध्ये राजकारणापासून अंतर राखले होते. त्यांनी काँग्रेसची सूत्रे पीव्ही नरसिम्हा राव यांना दिली व त्यांनी पूर्ण निकाल बदलले.

 राहुल गांधींनी जे म्हटले ते केले नाही -

प्रशांत किशोर यांनी म्हटले की, २०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की, पक्षाची जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी सोपवली जाईल. मात्र असे झाले नाही.

काँग्रेस पक्ष व काँग्रेसचे समर्थक कोणाही एका व्यक्तीपेक्षा मोठे आहेत. त्यामुळे राहुल यांनी अनेक अपयशानंतरही काँग्रेसचे नेतृत्व करावे हा, हट्ट सोडावा.

पराभवासाठी निवडणूक आयोग आणि मीडियाला जबाबदार धरणे चुकीचे-

प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना सल्ला दिला कि, निवडणुकीतील पराभवासाठी निवडणूक आयोग व माध्यमांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. राहुल गांधी निवडणूक हरल्यानंतर न्यायपालिका आणि मीडियावर आरोप करतात. हे आंशिक रूपाने सत्य असू शकते, मात्र संपूर्ण सत्य नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा केंद्रीय संस्थांवर इतका प्रभाव नव्हता. तरीही काँग्रेस २०६ जागांवरून ४४ जागांवर घसरली.

पुढील बातम्या