Congress Offers To Prakash Ambedkar : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केल्याने काँग्रेसचे टेंशन वाढले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा नवी ऑफर दिली आहे. पटोले म्हणाले, आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार आहे. ज्या जागा त्यांना हव्या आहेत त्या जागा देखील देण्यास तयार असल्याचे पटोले म्हणाले होते. यानंतर आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना नवीन ऑफर दिली आहे.
राज्यात सध्या काही जागांवरून महाविकास आघाडीत तिढा कायम आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी सोबत समझोता होऊ न शकल्याने प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे ची भूमिका घेत काँग्रेसचे टेंशन वाढवले आहे. त्यांनी राज्यात जवळपास सर्व जगावंर उमेदवार उभे केले आहे. काही ठिकाणी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी काही ठिकाणी काँग्रेस विरोधात उमेदवार उभे केल्याने याचा फटका त्यांना बसणार आहे. त्यामुळे पुन्हा वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यातूनच नाना पटोले यांनी पुन्हा वंचितला नवी ऑफर देण्याच्या तयारीत आहे.
या संदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिस अहमद म्हटले की, "प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही पुन्हा एकत्र येण्यास तयार आहोत. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पक्ष राज्यसभेत पाठवायला तयार आहे. यासोबट त्यांना केंद्रात मंत्रिपद देखील द्यायला तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा नवा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वेगळे लढण्याचा फायदा हा केवळ भाजपला होणार आहे. २०१९मध्ये देखील वंचितच्या भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसला होता. या वेळेलाही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या पाठिंब्या शिवाय निवडून येऊ शकत नाही. प्रकाश आंबेडकर हे आमचे मोठे बंधु असून, त्यांना राज्यसभेत पाठवण्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला ते मान्यता देतील अशी अपेक्षा देखील अहमद यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना घेण्यात येणार होते. मात्र, त्यांनी दिलेल्या जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीतील नेत्यांना पटला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. महाविकास आघाडीच्या बैठका होत असतांना त्यांना आमंत्रण दिले जात नसल्याचा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडले. मात्र, याचा फटका हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांची मनधरणी केली जात आहे.
संबंधित बातम्या