मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Dharashiv Loksabha : 'माझा नवरा भाजपचा आमदार, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू?' अजित पवारांच्या उमेदवाराचं अजब विधान

Dharashiv Loksabha : 'माझा नवरा भाजपचा आमदार, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू?' अजित पवारांच्या उमेदवाराचं अजब विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 07, 2024 07:09 PM IST

Dharashiv Loksabha Constituency : धाराशीव मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार अर्चना पाटील (archana patil) यांच्या विधानाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्जना पाटील यांनी म्हटले की, माझा नवरा भाजपचा आमदार आहे,मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू?

धाराशीव मतदारसंघातील  महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील
धाराशीव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील

Loksabha elections 2024 : जागावाटपाचं गुऱ्हाळ बरेच दिवस लांबल्यानंतर महायुतीत काही जागांचा पेच बाकी ठेऊन अन्य जागांवर उमेदवार निश्चित झाले. आता सर्वच पक्षांकडून व उमेदवारांकडून लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्व पक्ष व उमेदवार पक्षवाढीसाठी जोर लावत आहेत. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. मित्रपक्ष दुसऱ्या पक्षाच्या उमेदावाराला सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी येत असतानाच आता खुद आयात केलेला उमेदवारच पक्षाशी काही देणंघेणं नसल्याचे म्हणत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

धाराशीव मतदारसंघातील  (Dharashiv Loksabha Constituency) उमेदवार अर्चना पाटील (archana patil)  यांनी म्हटले की, माझा नवरा भाजपचा आमदार आहे, मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू? या विधानाने कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मी महायुतीची उमेदवार असून महायुतीतूनच विजयी होणार, असंही पाटील म्हणाल्या. धाराधीवचे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे अर्चना पाटील यांचे पती आहेत. आता अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीबाबत असं वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलं आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे. त्यांनी उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान आज बार्शीमध्ये प्रचार करताना अर्चना पाटील यांनी हे अजब विधान केले. अर्चना पाटील म्हणाल्या की, माझा पती भाजपच्या चिन्हावर आमदार झाला आहे, तर राजेंद्र राऊतदेखील भाजप आमदार आहेत, त्यांचा मला भावासारखा पाठिंबा आहे. असं असताना मी कशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू, मी महायुतीतूनच व भाजपच्या पाठिंब्यावरच विजयी होणार. 

महायुतीत जागावाटपाच्या बैठकीत धाराशिव मतदारसंघावरून बरीच रस्सीखेच झाली होती. त्यानंतर हा मतदारसंघा राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. त्यानंतर भाजपच्या अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचं बारामतीमध्ये नेतृत्व दिसत नाही. तुम्ही राष्ट्रवादी वाढवण्याचं काम करणार का? या प्रश्नावर अर्चना पाटील म्हणाल्या की, राष्ट्रवादी मी कशाला वाढवू? मी महायुतीची उमेदवार आहे. माझी उमेदवारी महायुतीकडून झाली आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि ४०० पारचा आकडा गाठण्यासाठी आहे. राजेंद्र राऊत महायुतीचे घटक असून त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. आम्ही महायुती वाढणार आहे.

WhatsApp channel