मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : दारू पिऊन पायलटने केले विमानाचे उड्डाण; प्रवाशांचा जीव टांगणीला! एअर इंडियानं केलं निलंबित

Viral News : दारू पिऊन पायलटने केले विमानाचे उड्डाण; प्रवाशांचा जीव टांगणीला! एअर इंडियानं केलं निलंबित

Mar 28, 2024, 07:49 AM IST

    • pilot flying flight after drinking alcohol : दिल्ली (Air India) विमानतळावर दारू पिऊन विमान उडवणाऱ्या एका पायलटला अटक करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून एयर इंडियाने या पायलटला निलंबित केले आहे.
दिल्ली विमानतळावर दारू पिऊन विमान उडवणाऱ्या एका पायलटला अटक करण्यात आली. (HT_PRINT)

pilot flying flight after drinking alcohol : दिल्ली (Air India) विमानतळावर दारू पिऊन विमान उडवणाऱ्या एका पायलटला अटक करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून एयर इंडियाने या पायलटला निलंबित केले आहे.

    • pilot flying flight after drinking alcohol : दिल्ली (Air India) विमानतळावर दारू पिऊन विमान उडवणाऱ्या एका पायलटला अटक करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून एयर इंडियाने या पायलटला निलंबित केले आहे.

Pilot flying flight after drinking alcohol : दिल्ली विमानतळावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॅप्टनपदासाठी एक वैमानिक विमान उडव होता. मात्र, विमान उड्डाण करण्यापूर्वी या वैमानिकाने मद्य प्राशन केले. यामुळे केबिन क्रूची चांगलीच धावपळ उडाली. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच वैमानिकाला अटक करण्यात आली आहे. तसेच या दारूड्या वैमानिकावर एयर इंडियाने कठोर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

विजय शिवतारेंची पवार विरोधाची तलवार म्यान? एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत दिलजमाई

वैमानिक नवीन कॅप्टनसाठी प्रशिक्षण विमान उडवत होता. देशांतर्गत उड्डाणे चालवणारे पायलट आणि केबिन क्रू यांना उड्डाण करण्यापूर्वी बीए चाचणी देणे आवश्यक आहे. ही चाचणी देत असतांना चक्क वैमानिकाने दारू पिऊन विमान उडवले. या वैमानिकाने परदेशातून भारतात विमान आणत असतांना दारू प्यायली होती. यामुळे एअर इंडियाने कडक कारवाई करत त्या पायलटला कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात अकोला ठरले सर्वात हॉट! पारा ४२ अंशांवर; महिना अखेर विदर्भात पावसाचा इशारा

दारू पिऊन परदेशातून भारतात विमान आणल्यावर दिल्ली विमानतळावर वैमानिकाची ब्रेथ ॲनालायझर (बीए) चाचणी घेण्यात आली. यात वैमानिक हा दारू प्यायला असल्याचे निष्पन्न झाले. टाटा समूहाच्या मालकीची असलेली इंडियन एअरलाइन ही या वैमानिकाविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करणार आहे. फुकेत-दिल्ली विमान गेल्या आठवड्यात दिल्लीत उतरल्यानंतर क्रू मेंबरची ब्रेथ ॲनालायझर चाचणी करण्यात आली होती.

Mumbai Weather Update : मुंबई, पुण्यात उन्हाची रखरख; वाढता तापमानामुळे नागरिक हैराण

या घटनेवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही या गोष्टी अजिबात सहन करत नाही आणि या पुढेही करणार नाही. या प्रकरणी आम्ही कठोर कारवाई करणार असून त्या पायलटची नोकरी आणि विमान उड्डाणाचा परवाना देखील काढून घेतला जाणार आहे. तसेच त्याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात येणार आहे. “मद्यधुंद अवस्थेत उड्डाण करणे हा फौजदारी गुन्हा आहे.”

आम्ही तुम्हाला सांगतो की पायलट नवीन कॅप्टनसाठी प्रशिक्षण विमान उडवत होता. देशांतर्गत उड्डाणे चालवणाऱ्या पायलट आणि केबिन क्रू यांना उड्डाण करण्यापूर्वी बीए चाचणी घेणे आवश्यक आहे. भारतातील फ्लाइटमध्ये दारू दिली जात नाही. परदेशातून येणाऱ्या विमानांच्या लँडिंगनंतर क्रू मेंबर्सना बीए चाचणी द्यावी लागते. २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत ३३ पायलट आणि ९७ केबिन क्रू मेंबर्स त्यांच्या बीए चाचणीत नापास झाले होते.

पुढील बातम्या