मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  टीव्हीवरील ऑन एअर कार्यक्रमात पत्रकाराने हासडली शिवी, नंतर न्यूज चॅनलने मागितली माफी, पाहा Viral Video

टीव्हीवरील ऑन एअर कार्यक्रमात पत्रकाराने हासडली शिवी, नंतर न्यूज चॅनलने मागितली माफी, पाहा Viral Video

Apr 24, 2024, 05:27 PM IST

  • TV Reporter Abused on Air Channel : पंतजलि प्रकरणात रिपोर्टिंग करताना एक पत्रकार चूक करून बसला. या पत्रकाराने निराश होत ऑन एअर रिपोर्टिंग दरम्यानच शिवी हासडली. यानंतर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आता या वृत्त वाहिनीने माफी मागितली आहे.

टीव्हीवरील ऑन एअर कार्यक्रमात पत्रकाराने हासडली शिवी

TV Reporter Abused on Air Channel : पंतजलि प्रकरणात रिपोर्टिंग करताना एक पत्रकार चूक करून बसला. या पत्रकाराने निराश होत ऑन एअर रिपोर्टिंग दरम्यानच शिवी हासडली. यानंतर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आता या वृत्त वाहिनीने माफी मागितली आहे.

  • TV Reporter Abused on Air Channel : पंतजलि प्रकरणात रिपोर्टिंग करताना एक पत्रकार चूक करून बसला. या पत्रकाराने निराश होत ऑन एअर रिपोर्टिंग दरम्यानच शिवी हासडली. यानंतर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आता या वृत्त वाहिनीने माफी मागितली आहे.

Reporter Abused During Live Coverage : सोशल मीडियावर एका रिपोर्टरने लाइव्ह कवरेज दरम्यान अश्लील बोलल्याचा व्हिडिओ हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की, रिपोर्टर सुप्रीम कोर्टाच्या बाहेर उभा राहून एका प्रकरणाची माहिती स्टूडियोत बसलेल्या अँकरला देत आहे. यावेळी रिपोर्टर एक शब्द बोलताना काही वेळ थांबतो. वाटते की, तो शब्द बोलण्यास किंवा समजण्यात त्याला कन्फ्यूज आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kejriwal Gets Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

पत्रकारितेत रिपोर्टिंग सर्वात कठीण कामापैकी एक मानले जाते. टीव्ही चॅनल रिपोर्टिंगमध्ये तर लाइव्ह कॅमऱ्यासमोर वास्तविक समय आणि ऑन एअर रिपोर्टिंग अजून कठीण होऊन बसते. कारण एखाद्याला घटनेचे विवरण सांताना विचार करत प्रतिक्रिया द्यावी लागते. दरम्यान एक रिपोर्टर ऑन एअर रिपोर्टिंग करताना अनेक चुका करून बसतात. काही लोकांसाठी हे खूपच लाजीरवाणे तर काहीसाठी मनोरंजकही असते. अशीच एक घटना मंगळवारी (२३ एप्रिल) रोजी एका प्रतिष्ठित चॅनलच्या टीव्ही न्यूज रिपोर्टरसोबत घडली.

अश्मित नावाचा एक रिपोर्टर सुप्रीम कोर्टात पतंजलि प्रकरणात रिपोर्टिंग करताना गोंधळला व अपशब्दांचा वापर करून बसला. रिपोर्टरने हताश होऊन ऑन एअर रिपोर्टिंग दरम्यान शिवी दिली. रिपोर्टरला माहिती होते की, तो लाईव्ह रिपोर्टिंग करत आहे. मात्र तरीही त्यांच्या तोंडातून अपशब्द बाहेर पडले. रिपोर्टरला लगेच आपल्या चुकीची जाणीव झाली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

दरम्यान महिला अँकर या रिपोर्टरच्या बचावात पुढे आली. तिने त्याचा संपर्क तोडत म्हटले की, आपण थोड्या वेळाने त्या मुद्द्यावर येऊ. अश्मित तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही.

या प्रकारानंतर न्यूज चॅनेलने माफी मागितली आहे. एक्सवर एक पोस्ट करत म्हटले आहे की, आज थेट प्रक्षेपणा दरम्यान एक पत्रकाराकडून अजाणतेपणी अयोग्य भाषेचा वापर केला गेला. त्याला हे माहित नव्हतं की आपण ऑन एअर आहोत. या चुकीबद्दल आम्ही अगदी प्रामाणिकपणाने माफी मागत आहोत, असे न्यूज चॅनेलने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कॅमेऱ्यासमोर चुका होणे सामान्य गोष्ट आहे. त्यात नवीन काही नाही. मात्र ही घटना काही वेळातच व्हायरल झाली. काही वेळेस चुका होतात. या गोष्टी शक्यतो जाणूनबुजून केलेल्या नसतात.

विभाग

पुढील बातम्या