मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JEE Main Result 2024 : जेईईचा निकाल जाहीर! ५६ विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी; जाणून घ्या कटऑफ

JEE Main Result 2024 : जेईईचा निकाल जाहीर! ५६ विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी; जाणून घ्या कटऑफ

Apr 25, 2024, 07:15 AM IST

    • JEE Main Result 2024 : जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
जेईईचा निकाल जाहीर! ५६ विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी; जाणून घ्या कटऑफ

JEE Main Result 2024 : जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.

    • JEE Main Result 2024 : जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.

JEE Main Result 2024 : जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. विद्यार्थ्यांना jeemain.nta.ac.in या संकेत स्थळावर जाऊन निकाल पाहता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जानेवारी आणि एप्रिल सत्रासाठी पेपर १ बीई आणि बीटेकचा एकत्रित निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ५६ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले आहे. यात दोन मुलींचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थी तेलंगणातील आहेत. तेलंगणातील १५, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी सात आणि दिल्लीतील सहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तब्बल २ लाख ५० हजार २८४ मुलांनी आयआयटी प्रवेश परीक्षा JEE Advanced साठी पात्र ठरले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Maharashtra Weather Update: मुंबई पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा; असे असेल आजचे हवामान

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने सांगितले की, परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या २९ उमेदवारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना आता पुढील तीन वर्षांसाठी ही परीक्षा देता येणार नाही. या परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात १० लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. आसाम, बंगाल, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूमध्ये य भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

Amit Shah On Pawar : शरद पवार म्हणतात, अमरावतीकरांची माफी मागतो, मग ‘त्या’ कुटुंबांची माफी कधी मागणार?, अमित शहांचा सवाल

जानेवारीच्या सत्रात २३ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले होते. तर एप्रिलच्या सत्रात ३३ उमेदवारांनी १०० गुण मिळवले आहे. एकत्रित निकालात १०० टक्के मिळालेल्या एकूण ५६ उमेदवारांपैकी ४० उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत. तर १० ओबीसी, ६ जनरल ईडब्ल्यूएस श्रेणीतील आहेत. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील एकही उमेदवाराला १०० टक्के गुण मिळवता आले नाही.

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

कोणत्या राज्यातील किती विद्यार्थ्यांना मिळाले १०० टक्के गुण?

तेलंगणा: १५ विद्यार्थी

महाराष्ट्र: ७ विद्यार्थी

आंध्र प्रदेश : ७ विद्यार्थी

राजस्थान : ५ विद्यार्थी

दिल्ली (NCT): ६ विद्यार्थी

कर्नाटक : ३ विद्यार्थी

तामिळनाडू: २ विद्यार्थी

पंजाब: २ विद्यार्थी

हरियाणा: २ विद्यार्थी

गुजरात: २ विद्यार्थी

उत्तर प्रदेश: १ विद्यार्थी

इतर: १ विद्यार्थी

झारखंड: १ विद्यार्थी

चंदीगड: १ विद्यार्थी

बिहार: १ उमेदवार

दिल्लीतील १०० टक्के गुण मिळालेलेले विद्यार्थी

शायना सिन्हा

माधव बन्सल तनय झा

इप्सित मित्तल

भावेश रामकृष्णन कार्तिक

अर्थ गुप्ता

जेईई ॲडव्हान्स्ड कटऑफ पाच वर्षांत सर्वाधिक

JEE Advanced 2024 परीक्षेसाठी श्रेणीनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. जेईई मेनसाठी बसलेल्या १०६७९५९ उमेदवारांपैकी २५०,२८४ जेईई ॲडव्हान्स्डसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अनारक्षित कोट्यातील ९७,३५१ विद्यार्थी, अनारक्षित पीडब्ल्यूडी कोट्यातील ३९७३ विद्यार्थी आहेत. EWS मधून २५०२९ उमेदवार, OBC मधून ६७,५७०, SC मधून ३७५८१, SCT मधून १८७८० उमेदवार पात्र ठरले आहेत. या वर्षी जेईई ॲडव्हान्स्डचा कटऑफ स्कोअर ९३.२३ आहे, तर गेल्या वर्षी तो ९०.७ होता. ओबीसी एनसीएलसाठी हा ७९.६ आहे, तर गेल्या वर्षी ते ७३.६ होता. EWS साठी ८१.३ (गेल्या वर्षी ७५.६), SC साठी ६० (गेल्या वर्षी ५१.९) आणि ST साठी ४६.६९ (गेल्या वर्षी ३७.२३) आहे. २०२२ मध्ये, अनारक्षित श्रेणीसाठी JEE (Advanced) कट ऑफ ८८.४, OBC साठी ६७, EWS साठी ६३.१: SC उमेदवारांसाठी ते ४३ होते; आणि ST उमेदवारांसाठी ते २६.७ होते.

१०० टक्के मिळवलेल्या दोन मुली कोण आहेत?

१०० टक्के गुण मिळालेल्या मुलींमध्ये कर्नाटकातील सान्वी जैन आणि दिल्लीतील शायना सिन्हा यांचा समावेश आहे. बाकी सर्व मुले आहेत. २०२३ मध्ये ४३ जणांना १०० टक्के गुण मिळाले होते, तर यावेळी ही संख्या ५६ आहे. गेल्या वर्षी फक्त एका मुलीला १०० टक्के मिळाले होते.

विभाग

पुढील बातम्या