मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Job Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी! जूनच्या तिमाहीत कंपन्या करणार मेगा भरती

Job Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी! जूनच्या तिमाहीत कंपन्या करणार मेगा भरती

Mar 13, 2024, 07:38 AM IST

    • Job Alert news : मॅनपॉवरग्रुपच्या ताज्या जॉब्स आउटलुक सर्वेक्षणानुसार, भारतातील ३६ टक्के कंपन्यांनी जून महिन्याच्या तिमाहीत कर्मचारी भरती करण्याची योजना आखली आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी! जूनच्या तिमाहीत कंपन्या करणार मेगा भरती

Job Alert news : मॅनपॉवरग्रुपच्या ताज्या जॉब्स आउटलुक सर्वेक्षणानुसार, भारतातील ३६ टक्के कंपन्यांनी जून महिन्याच्या तिमाहीत कर्मचारी भरती करण्याची योजना आखली आहे.

    • Job Alert news : मॅनपॉवरग्रुपच्या ताज्या जॉब्स आउटलुक सर्वेक्षणानुसार, भारतातील ३६ टक्के कंपन्यांनी जून महिन्याच्या तिमाहीत कर्मचारी भरती करण्याची योजना आखली आहे.

Job Alert news update : रोजगार शोधणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतातील उद्योग आणि विविध कंपन्या जून महिन्याच्या तिमाहीत मेगा भरतीची योजना आखत आहेत. मॅनपॉवरग्रुपच्या ताज्या जॉब्स आउटलुक सर्वेक्षणानुसार, भारतातील ३६ टक्के कंपन्या पुढील तिमाहीत कर्मचारी नियुक्त करण्यासाठी भरतीचे नियोजन करणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

bharat jodo nyay yatra : भारत जोडो न्याय यात्रा पोहचणार मालेगावात! शरद पवार, संजय राऊत राहणार उपस्थित

या सर्वेक्षणावर आधारित अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये सुमारे ३ हजार १५० कंपण्याशी चर्चा करण्यात आली. अहवालानुसार, जगातील ४२ देशांमध्ये भारताची नोकर भरतीची स्थिती सर्वात मजबूत राहणार आहे. तर पुनरावलोकनाधीन कालावधीत, ५० टक्के रोजगार देणाऱ्या कंपन्या म्हणाल्या की कामगारांचे पगार वाढणार आहेत, तर १४ टक्के म्हणाले की पगार वाढ कमी अपेक्षित आहे, तर ३३ टक्के कंपन्या कोणत्याही बदलाची अपेक्षा करत नाहीत.

Sunetra Pawar: तुम्ही साथ दिली तर मोठे पाऊल उचलेन! बारामती लोकसभेबाबत सुनेत्रा पवारांचं मोठ विधान

४२ देशांमधील भरतीची परिस्थिती भारतात सर्वात मजबूत

मॅनपॉवर ग्रुपने निवेदनात म्हटले आहे की, ३६ टक्के निव्वळ रोजगार निर्मितीसह भारत जगभरातील देशांच्या यादीत अव्वल राहणार आहे. भरतीदरम्यान कंपन्यांना टॅलेंटची कमतरता भासत आहे. एप्रिल-जून २०२३ च्या तुलनेत भारताचा निव्वळ रोजगाराचा दर ६ टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

अनेक व्यावसायिक संघ सदस्यांनी राजीनामा दिला आहे: स्पाइसजेट

स्पाइसजेटने मंगळवारी सांगितले की, विमान कंपनीच्या धोरणात्मक पुनर्रचनेचा भाग म्हणून त्यांच्या व्यावसायिक संघातील अनेक सदस्यांनी तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. सूत्रांनी सोमवारी सांगितले की एअरलाइनचे मुख्य परिचालन अधिकारी अरुण कश्यप आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी शिल्पा भाटिया यांनी राजीनामा दिला आहे. एअरलाइनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडील भांडवल वाढीसह, कंपनी मागील सर्व विवादांचे निराकरणाचा वेग वाढवणार असून महसूल आणि प्रवासी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे.

पुढील बातम्या