मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  School bus Accident : १२० च्या स्पीडने जाणारी स्कूल बस उलटली; ६ मुलांचा मृत्यू, दारूच्या नशेत होता चालक

School bus Accident : १२० च्या स्पीडने जाणारी स्कूल बस उलटली; ६ मुलांचा मृत्यू, दारूच्या नशेत होता चालक

Apr 11, 2024, 04:56 PM IST

  • School bus Accident : भरधाव बस पलटल्याने ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही बस खासगी शाळा जीएल पब्लिक स्कूलची आहे. या अपघातात जवळपास १५ मुले जखमी झाली आहेत.

१२० च्या स्पीडने जाणारी स्कूल बस पलटली, ६ मुलांचा मृत्यू

SchoolbusAccident : भरधाव बस पलटल्याने ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही बस खासगी शाळा जीएल पब्लिक स्कूलची आहे. या अपघातात जवळपास १५ मुले जखमी झाली आहेत.

  • School bus Accident : भरधाव बस पलटल्याने ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही बस खासगी शाळा जीएल पब्लिक स्कूलची आहे. या अपघातात जवळपास १५ मुले जखमी झाली आहेत.

School bus Accident in Haryana : हरियाणा राज्यातील महेंद्रगडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी एक भरधाव स्कूल बस अनियंत्रित होऊन पलटली. बसमध्ये जवळपास ३५ ते ४० मुले होती. अपघातानंतर ६ मुलांची प्रकृती गंभीर होती. त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जात असताना त्यातील ५ मुलांचा मृत्यू झाला. एका मुलगा गंभीररित्या जखमी होता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. काही वेळात त्याचाही मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात महेंद्रगड जिल्ह्यातील कनीना परिसरात कनीना-दादरी मार्गावर झाला. अपघातग्रस्त बस एका खासगी शाळेची आहे. या अपघातात जवळपास १५ मुले जखमी झाली आहेत. 

पोलिसांकडून तपास सुरू, नशेत होता चालक (driver was drunk) ?

अपघातानंतर स्थानिक लोक तत्काल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांनी दावा केला की, बस चालक दारूच्या नशेत होता. काही वेळातच पोलीस व प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाले व रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून स्थानिकांच्या आरोपानंतर पोलीस याचाही तपास करत आहेत की, बस चालक दारूच्या नशेत होता की नाही. दरम्यान स्कूल बसचे फिटनेस प्रमाणपत्र २०१८ मध्येच संपले होते.

स्कूल बसमध्ये ३५ ते ४० मुले होती -

मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस उन्हानी गावाजवळ पलटली. ही बस खासगी स्कूल जीएल पब्लिक स्कूलची आहे. सांगितले जात आहे की, आज ईदनिमित्त सरकारी सुट्टीच्या दिवशीही स्कूल सुरू ठेवले होते आणि मुलांना आणण्यासाठी स्कूल बस पाठवली होती.

अपघातानानंतर स्थानिक लोक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य सुरू केले. घटनास्थलीच पाच मुलांचा मृत्यू झाला होता तर एकाची प्रकृती गंभीर होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याने एकूण ६ मुलांचा मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर मुलांना रेस्क्यू करताना स्थानिक लोकांचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत दिसते की, अपघातानंतर बसचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये दिसते की, मुले रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. 

पुढील बातम्या