मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: किंग कोब्रा आणि मुंगूसाची तुंबळ लढाई; शेवटी कोण जिंकले?, पाहा व्हिडिओ

Viral Video: किंग कोब्रा आणि मुंगूसाची तुंबळ लढाई; शेवटी कोण जिंकले?, पाहा व्हिडिओ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 10, 2024 07:47 PM IST

Snake Mongoose Fight Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका खड्ड्यातकिंग कोब्रा व मुंगूस बसलेले आहेत. दोघांमध्ये तुंबळ युद्ध होत आहे.

 किंग कोब्रा आणि मुंगूसाची तुंबळ लढाई
 किंग कोब्रा आणि मुंगूसाची तुंबळ लढाई

Viral Video:साप व मुंगूसाची दुश्मनी कोणापासून लपून राहिलेली नाही. जर दोघे आमने-सामने आले तर यांच्यात लढाई होणे ठरलेलेच असते. सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, साप व मुंगूसा दरम्यान भीषण लढाई होत आहे. साप व मुंगूस एकमेकांचे कट्टर शूत्र समजले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका खड्ड्यातकिंग कोब्रा व मुंगूस बसलेले आहेत. दोघांमध्ये तुंबळ युद्ध होत आहे. मुंगूस व सापामध्ये छत्तीसचा आकडा असतो मात्र सापाच्या बिळात जाऊन त्यांच्याशी दोन हात करणे सोपी गोष्ट नाही. व्हिडिओमध्ये दिसते की, मुंगूसच सापावर भारी पडताना दिसत आहे. सोशल मीडिया व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत.

झाला ना पचका ! ऑफिसमधून इमर्जन्सी सुट्टी घेऊन IPL सामना पाहायला गेली महिला, बॉसने टीव्हीवर पाहिले, अन्..

व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता की, मुंगूसाने आपल्या पायाने सापाचे तोंड दाबून धरले आहे. हा व्हिडिओ एक्स वर@TheBrutalNatureनावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच याच्यावर शेकडो कमेंट आली आहेत. मुंगूस सापाशी अशा पद्धतीनेही लढू शकते, हे पाहून लोक थक्क झाले आहेत.

एका यूजरने म्हटले की, कोब्राची बाइट मुंगूसाला सहन होणार नाही. दुसऱ्या यूजरने म्हटले की, हे कसे काय संभव आहे?मुंगूस तर लढूही शकत नाही. तिसऱ्या एका यूजरने म्हटले की, असे होऊ शकत नाही की, मुंगूसाचा विजय झाला असेल. मला हे जाणून घ्यायचे आहे की, ही लढाई कुठे जाऊन संपली.

तरुणीचा रेल्वे स्टेशनवरील डान्स व्हायरल-

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, लाल साडी परिधान करून एक मुलगी रेल्वे स्टेशनवर उभी आहे व अचानक डान्स करू लागते. मुलीच्या पाठीमागे एक महिला चालत येताना दिसते. ही महिलाही डान्समध्ये मुलीहून कमी नाही. मुलीच्या पाठीमागे महिलेने असा काही भन्नाट डान्स केला की, व्हिडिओ व्हायरल झाला.

 

IPL_Entry_Point

विभाग