मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Alexa च्या मदतीनं चिमुरडीनं लहान बहिणीला माकडांपासून वाचवलं; आता आनंद महिंद्रांनी दिली मोठी ऑफर!

Alexa च्या मदतीनं चिमुरडीनं लहान बहिणीला माकडांपासून वाचवलं; आता आनंद महिंद्रांनी दिली मोठी ऑफर!

Apr 07, 2024, 05:46 PM IST

  • Anand Mahindra News : चिमुकलीने घरात शिरलेल्या माकडाला पळवून लावत आपल्या लहान बहिणीला वाचवलं होतं. या मुलीच्या धाडसाचं कोतुक करत आनंद महिंद्रा यांनी तिला नोकरीची ऑफर दिली आहे.

चिमुकलीला आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर!

Anand Mahindra News : चिमुकलीने घरात शिरलेल्या माकडाला पळवून लावत आपल्या लहान बहिणीला वाचवलं होतं. या मुलीच्या धाडसाचं कोतुक करत आनंद महिंद्रा यांनी तिला नोकरीची ऑफर दिली आहे.

  • Anand Mahindra News : चिमुकलीने घरात शिरलेल्या माकडाला पळवून लावत आपल्या लहान बहिणीला वाचवलं होतं. या मुलीच्या धाडसाचं कोतुक करत आनंद महिंद्रा यांनी तिला नोकरीची ऑफर दिली आहे.

उत्तरप्रदेशमधील बस्ती या जिल्ह्यात राहणाऱ्या एका १३ वर्षीय चिमुकलीने धैर्य दाखवत आपल्या लहान बहिणीला माकडांपासून वाचवलं होतं. मुलीने एलेक्साच्या मदतीने आपल्या घरात शिरलेल्या माकडाला पळवून लावलं होतं. मुलीच्या साहसाचे कौतुक करत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुलीला नोकरीची ऑफर दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

अनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर नेहमी सक्रीय असतात. एक्सवर पोस्ट करत ते आपले मत मांडत असतात,तर कधी हटके व्हिडिओ पोस्ट करत असतात. आनंद महिंद्रा आपल्या पोस्टमधून अनेक नाविण्यपूर्ण कल्पनांचे कौतुकही करताना दिसतात. आता आनंद महिंद्रा यांनी एका १३ वर्षाच्या मुलीच्या धाडसाचं कौतुक करत तिला नोकरीची ऑफर दिली आहे. या मुलीने एलेक्साच्या मदतीने लहान मुलीला वाचवलं होतं.

या चिमुकलीने घरात शिरलेल्या माकडाला पळवून लावत आपल्या लहान बहिणीला वाचवलं होतं. मुलीने घरात शिरलेल्या माकडाला न घाबरता एलेक्साला कुत्र्यांचा भूकण्याचा आवाज काढण्याची कमांड दिली. त्यानंतर एलेक्सा उपकरणातून कुत्र्याच्या भूकण्याचा आवाज येऊ लागला. कुत्र्याचा आवाज ऐकून माकड घरातून पळून गेले. मुलीच्या प्रसंगावधानाने तिने १५ महिन्याच्या लहान बहिणीचा जीव वाचवला आहे.

या १३ वर्षांच्या चिमुकलीने प्रसंगावधान राखत आपल्या बुद्धिमत्ता दाखवत अ‍ॅलेक्साच्या मदतीने घरात शिरलेल्या माकडांना पिटाळून लावले.आपल्या कृतीने तिने आपल्यासह १५ महिन्यांच्या बहिणीचाही जीव वाचवला.१३ वर्षीची चिमुकली आपल्या लहान बहिणीसह घरी एकटीच असताना काही माकडं घरात शिरली. माकडं घरातील सामानांची धासधूस करत होती. या माकडांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या मुलीने अ‍ॅलेक्साची मदत घेतली. मुलीने अ‍ॅलेक्साला कुत्र्याचा भुंकण्यांचा आवाज काढायला सांगितले. तिची ही युक्ती कामी आली व या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून माकडांना धूम ठोकली.

काय म्हणाले आनंद महिंद्रा -

मुलीच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा यांनी मुलीला नोकरीची ऑफर दिलीय. आनंद महिंद्रा यांनी नव्या तंत्रज्ञानाविषयी आपलं मत मांडताना म्हटले की, जगासमोर एकच प्रश्न आहे की, आपण टेक्नोलॉजीसमोर गुडघे टेकतो की आपण त्याला आपला मार्गदर्शक करतो?

या मुलीने याचेउत्तर दिले आहे. टेक्नोलॉजी नेहमी मानवी बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणारी राहील. या मुलीने अशा प्रसंगात केलेला विचार खूप असाधरण होता. तिने जे केले ते अप्रत्यक्ष जगात नेतृत्त्व करण्याची क्षमता असल्याचं होतं. जर तिला तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट जगतात येण्याची इच्छा असेल तर,मला आशा आहे की@MahindraRiseयेथे ती आमच्यात सामील होऊ शकते.

पुढील बातम्या