Bengaluru Viral Video : देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तुम्ही ऐकली असेल. या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव एका दुचाकी चालकाला आला आहे. गेल्या आठवड्यात, सिलिकॉन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना घडली असून ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बेंगळुरूमधील एका रस्त्यावरील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ महालक्ष्मीपुरम लेआउटमधील असल्याचे सांगितले जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार एका अरुंद रस्त्यावर एक व्यक्ति हा बैल घेऊन रस्त्याने जात होता. त्या व्यक्तीच्या हातात बैलाची दोरी होती. दरम्यान या व्यक्तीच्या पुढच्या बाजूने एक व्यक्ति दुचाकीवरून येत होता. तर त्या व्यक्तीच्या मागून एक ट्रक येत होता. दुचाकीजशी जवळ आली तशी व्यक्तीचा बैल हा उधळला आणे त्याने समोरून दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर उडी मारली. यावेळी, हा व्यक्ति दुचाकीवरुन खाली पडला. तसेच समोरून येणाऱ्या ट्रकच्या खाली आला. ही संपूर्ण घटना व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्यक्ति खाली पडल्यावर त्याचे डोके ट्रकच्या मागच्या टायरमध्ये येणारच होते, तेवढ्यात ट्रकचालकाने लगेच ब्रेक लावल्याने थोडक्यात या व्यक्तीचे प्राण वाचले.
भर रस्त्यात घडलेले हे भीषण दृश्य पाहून तिथले लोक देखील हैराण झाले आहेत. दुचाकी चालक खाली पडताच त्याला वाचवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. त्यांना हा व्यक्ति ट्रक खाली येऊन त्याचा मृत्यू झाला असे वाटले.
मात्र, ट्रक जागेवरच थांबल्याने हा व्यक्ति थोडक्यात बचावला. नगरिकांनी त्याची विचारपूस करून त्याची गाडी उचलून रस्त्याच्या कडेला लावली. आपल्यासोबत घडलेल्या या घटनेने दुचाकीचालक देखील हैराण झाला आहे. तो थोडक्यात बचवल्याने त्याने देवाचे आभार मानले. तसेच देव तरी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती देखील त्याला आली. आपला जीव वाचला याचा क्षणभर त्याला सुध्दा विश्वास बसत नव्हता.
सोशल मिडीयावर अनेक नेकऱ्यांनी हा व्हिडिओ पहिला आहे. त्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ १.२ मिलियन लोकांनी पहिला आहे. अनेकांनी दुचाकी चलकाच्या नशिबाचे कौतुक केले आहे. तर रस्त्यावरून जाणाऱ्या पाळीव प्राण्यांबद्दल देखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.