Alexa Device Helped UP Girl Save Self: अॅमेझॉनची व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंट अॅलेक्साचा वापर करून उत्तर प्रदेशातील बस्ती येथील एका १३ वर्षीय मुलीने माकडांच्या संभाव्य हल्लापासून स्वत:ला आणि तिच्या भाचीला वाचवले. बस्तीतील आवास विकास कॉलनीतील ही घटना आहे. माकडांना पळवून लावण्यासाठी संबंधित मुलीने अॅलेक्साचा योग्य वापर केला. ज्यामुळे सर्वत्र तिचे कौतूक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता बस्तीतील आवास विकास कॉलनीत आपल्या कुटुंबासोबत राहते. निकीता आपल्या भाचीसोबत घरात खेळत असताना स्वयंपाकघरात माकडांनी प्रवेश केल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर तिने स्वयंपाक घरात जाऊन पाहिले असता माकडं स्वयंपाक घरातील वस्तू इकडे तिकडे फेकताना दिसले. त्यावेळी निकताचे लक्ष फ्रीजवर ठेवलेल्या अॅलेक्सा डिव्हाइसवर गेले. माकडांना घाबरवण्यासाठी तिने अॅलेक्साला भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज काढायला सांगितला. त्यानंतर अॅलेक्सा भुंकणाऱ्या कुत्र्याचा काढण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून सर्व माकडं पळून गेली आणि संभाव्य धोका टळला.
निकिताने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "आमच्या येथे आलेल्या काही पाहुण्यांनी परत जाताना घराचा गेट उघडाच ठेवला. त्यामुळे माकडे आमच्या स्वंयपाक घरात घुसले आणि वस्तू इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली. त्यानंतर मी जवळ असलेल्या अॅलेक्साला कुत्र्याचा आवाज काढण्यास सांगितले आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून माकडं घाबरून पळून गेले.
निकिताची आई शिप्रा ओझाने आपल्या मुलीने दाखवलेल्या हुशारीचे कौतुक केले. संभाव्य धोका आणि नुकसानापासून निकीताने वाचवल्याचे शिप्रा यांनी म्हटले. अॅलेक्साच्या इतक्या चांगल्या वापरामुळे दोन्ही मुली माकडांच्या संभाव्य हल्ल्यापासून बचावल्या. माकडांनी स्वयंपाक घरात प्रवेश केला, तेव्हा आम्ही दुसऱ्या खोलीत होतो, असेही शिप्रा यांनी सांगितले.
अॅमेझॉनची क्लाऊड-आधारित व्हर्च्युअल असिस्टंट अॅलेक्सा हवामान तपासण्यापासून ते स्मार्ट होम डिव्हाइसनियंत्रित करण्यापर्यंत अनेक कामे करू शकते. अनपेक्षित परिस्थितीत मदत करण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकते, हे उत्तर प्रदेशातील घटनेने सिद्ध केले.