मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : ग्लासमध्ये केली लघुशंका आणि अटेन्डेंटवर फेकली! मद्यधुंद व्यक्तीचा विमानात गोंधळ

Viral news : ग्लासमध्ये केली लघुशंका आणि अटेन्डेंटवर फेकली! मद्यधुंद व्यक्तीचा विमानात गोंधळ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 06, 2024 01:58 PM IST

passenger fined for urinating cup in flight : फ्लाइट दरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने (sydney airline) एका ग्लासात लघवी केली आणि यानंतर ती विमान अटेन्डेंटवर फेकल्याने या प्रवाशाला दंड ठोठावण्यात आला आहे.

ग्लासमध्ये केली लघुशंका आणि अटेन्डेंट फेकली! मद्यधुंद व्यक्तीचा विमानात गोंधळ
ग्लासमध्ये केली लघुशंका आणि अटेन्डेंट फेकली! मद्यधुंद व्यक्तीचा विमानात गोंधळ

passenger fined for urinating cup in flight : विमानात प्रवाशांनी गोंधळ घालण्याची घटना आता नवीने राहिली नाही. रोज अशा काहीना काही घटना उघडकीस येत असतात. सिडनी एयरलाइनच्या विमानात एका मध्यधुंद प्रवाशाने तर कहर केला. दारूच्या नशेत या प्रवाशाने ग्लासमध्ये लघवी केली आणि विमानातून उतरत असतांना त्याने ही लघवी विमान अटेन्डेंटवर फेकली. या घटनेमुळे विमानात चांगलाच गोंधळ उडाला. या विमानाला उशीर झाल्याने गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाला विमान कंपनीने मोठा दंड ठोठावला.

ट्रेंडिंग न्यूज

Amazon Alexa: माकडांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी मुलीनं लढवली अनोखी शक्कल; अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचा केला 'असा' वापर!

गेल्या डिसेंबरमध्ये ऑकलंडहून एअर न्यूझीलंडच्या 3 तासांच्या उड्डाणादरम्यान, ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी याची शुक्रवारी महिती देताना सांगितले की सिडनी कोर्टाने फेब्रुवारीमध्ये प्रवाशाच्या या वर्तनासाठी त्याला ६०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स दंड ठोठावला.

या संदर्भात शुक्रवारी न्यूझीलंडच्या न्यूज वेबसाइट स्टफने वृत्त दिली. सिडनी एयरलाइनच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने गोंधळ घातला. या बाबत माहिती देतांना विमानातील दुसऱ्या एका प्रवाशाने सांगीतले की, विमानाच्या क्रूला या प्रवाशाच्या वर्तणूकाबाबत कळवण्यात आले होते. ही प्रवासी महिला तिच्या १५ वर्षांच्या मुलीसह मधल्या सीटवर बसली होती. यावेळी विंडो सीटवर बसलेला माणूस कपमध्ये लघवी करत होता. या गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Shrikant Shinde : कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा

हॉले नामक महिला प्रवाशाने माहिती देतांना संगितले की, या प्रवाशाच्या गोंधळामुळे हे विमान सुमारे २०  मिनिटे उशिरा पोहचले. गोंधळ घालणारा माणूस हा स्पष्टपणे नशेत होता. त्याने विमानातून बाहेर पडताना फ्लाइट अटेंडंटवर ही लघवी फेकली.

ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी त्याला विमानातून काढून टाकले कारण त्याने सीटवर असताना कपमध्ये लघवी केली होती. एअर न्यूझीलंडने सांगितले की ते वैयक्तिक घटनांवर भाष्य करत नाही. मद्यधुंद वर्तनासाठी दर महिन्याला पाच ते दहा ग्राहकांवर विमान कंपनी बंदी घालते, असे एअरलाइनचे म्हणणे आहे.

या पूर्वी सुद्धा एका प्रवाशाने विमानात असतांना एका महिलेशी गैरवर्तन केले होते. त्याने एका महिलेकडे पाहून विमानातच हस्तमैथुन करतांना आढळला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. तसेच विमान कंपनीने त्याचवर बंदी घातली होती. यावेळी देखील या प्रवाशाला दंड ठोठावण्यात आला होता.

IPL_Entry_Point