मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वे प्रवास महागला! प्रवाशांचे सामान अन् माल वाहणाऱ्या कुलींच्या मजुरीत ५ वर्षांनी वाढ; असे असणार नवे दर, वाचा!

रेल्वे प्रवास महागला! प्रवाशांचे सामान अन् माल वाहणाऱ्या कुलींच्या मजुरीत ५ वर्षांनी वाढ; असे असणार नवे दर, वाचा!

Mar 30, 2024, 07:28 AM IST

    • Coolie new rate : रेल्वे स्थानकावर अतिशय महत्वाचा घटक असणाऱ्या कुली यांच्या मजुरीत रेल्वेने तब्बल पाच वर्षांनी वाढ केली आहे. प्रवाशांचे सामान उचलन्यापासून ते इतर सामान प्रामुख्याने कुली वाहून नेत असतात.
प्रवाशांचे सामान अन् माल वाहणाऱ्या कुलींच्या मजुरीत ५ वर्षांनी वाढ

Coolie new rate : रेल्वे स्थानकावर अतिशय महत्वाचा घटक असणाऱ्या कुली यांच्या मजुरीत रेल्वेने तब्बल पाच वर्षांनी वाढ केली आहे. प्रवाशांचे सामान उचलन्यापासून ते इतर सामान प्रामुख्याने कुली वाहून नेत असतात.

    • Coolie new rate : रेल्वे स्थानकावर अतिशय महत्वाचा घटक असणाऱ्या कुली यांच्या मजुरीत रेल्वेने तब्बल पाच वर्षांनी वाढ केली आहे. प्रवाशांचे सामान उचलन्यापासून ते इतर सामान प्रामुख्याने कुली वाहून नेत असतात.

Railway coolie new rate: कुलींच्या सुविधा वाढवल्यानंतर रेल्वे बोर्डाने आता त्यांच्या मजुरीत देखील वाढ केली आहे. वाढती महागाई लक्षात घेता माल वाहून नेण्यासाठी कुलींची मजुरी वाढवण्यात यावी ही अनेक दिवसांची मागणी होती. ही मागणी तब्बल ५ वर्षांनंतर मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांसारख्या अनेक प्रकारच्या सुविधा देखील दिल्या जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Amul Hikes Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ, सोमवारपासून द्यावे लागणार इतके पैसे!

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून भटक्या कुत्र्याचा प्रवास, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Thane Murder: ठाण्यात विवाहित बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून तरुणाची हत्या, एकाला अटक

PM Modi : एक्झिट पोलच्या निकालानंतर पीएम मोदी ॲक्शन मोडमध्ये, पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा तयार; करतील 'ही' कामे

Mumbai local mega block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा! ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक

कुली हा रेल्वे स्थानकावरील अतिशय महत्वाचा घटक आहे. प्रवाशांचे सामान उचलने तसेच स्थानकावर इतर मालाची वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने कुली यांना प्रधान्य दिले जाते. त्यांच्या मजुरीच्या दरवाढी संदर्भात अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे.

या संदर्भात रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , जवळपास पाच वर्षांनंतर सामान घेऊन जाणाऱ्या कुलींचे दर वाढवण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर रायपूर विभागात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. देशभरातील सर्व ६८ विभागांमध्ये याची अंमलबजावणी करावी, असे मंडळाने म्हटले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना कुली दरांचे पुनरावलोकन आणि व्यवस्थापन करण्याचे अधिकार असतील.

Maharaashtra Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

हे नवीन दर आहेत

४० किलोपेक्षा जास्त वजन असल्यास रेल्वे प्रवाशाला २५० रुपयांऐवजी आता २४० रुपये मोजावे लागणार आहेत. वृद्ध किंवा आजारी व्यक्तीला व्हील चेअरवर आणण्यासाठी १३० रुपयांऐवजी १८० रुपये मोजावे लागतील. आजारी व्यक्तीला स्ट्रेचरवर नेण्यासाठी २०० रुपयांऐवजी २७० रुपये मोजावे लागतील. कुलींच्या मजुरीचे नवे दर देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर (A1 आणि A श्रेणी) लागू होतील. त्याच वेळी, लहान रेल्वे स्थानकांवर दर थोडे कमी असतील. रेल्वे प्रवासी निश्चित दरापेक्षा जास्त पैसे मागितल्यास स्टेशन मास्टरकडे तक्रार करू शकतील. पोर्टरचे दर वाढल्याने त्यांना आर्थिक फायदा होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

कुलींना मिळणार ही सुविधा

रेल्वे बोर्डाने सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक वर्षांपूर्वी कुलींना मोफत वैद्यकीय उपचार, शिक्षण, रेल्वे पास आदी सुविधा सुरू केल्या होत्या. कुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे रुग्णालयात मोफत प्रवास करता येणार आहे. यामध्ये पंतप्रधान आयुष्मान भारत योजना कार्डधारकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय पोर्टर्सना दरवर्षी तीन लाल शर्ट आणि एक उबदार शर्ट दिला जातो. याव्यतिरिक्त, त्यांना दरवर्षी एक पास आणि प्रिव्हिलेज तिकीट ऑर्डर (PTO) दिला जाईल. स्थानकांवर पोर्टर्सना स्वत:हून विश्रामगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये टीव्ही, आरओ पाणी आणि बेड इत्यादी आवश्यक सुविधा असतील. त्यांच्या मुलांना रेल्वे शाळेत मोफत शिक्षणाची सोय आहे.

पुढील बातम्या