मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक! मानवी हाडांपासून बनवली खुर्ची आणि पलंग ! तर घरात सापडल्या २५ मानवी कवट्या

खळबळजनक! मानवी हाडांपासून बनवली खुर्ची आणि पलंग ! तर घरात सापडल्या २५ मानवी कवट्या

Mar 12, 2024, 08:39 AM IST

    • karnataka crime news : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामनगरा (karnataka ramnagra crime) जिल्ह्यातील जोगनहल्ली गावात घडली आहे. एका व्यक्तीच्या फार्म हाऊसवर २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडली आहेत.
कर्नाटकात एका जिल्ह्यात एकाने मानवी हाडांपासून खुर्ची आणि पलंग तयार केले असून त्याच्या घरात २५ मानवी कवट्या सापडल्याने खळबळ उडाली आहे.

karnataka crime news : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामनगरा (karnataka ramnagra crime) जिल्ह्यातील जोगनहल्ली गावात घडली आहे. एका व्यक्तीच्या फार्म हाऊसवर २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडली आहेत.

    • karnataka crime news : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामनगरा (karnataka ramnagra crime) जिल्ह्यातील जोगनहल्ली गावात घडली आहे. एका व्यक्तीच्या फार्म हाऊसवर २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडली आहेत.

karnataka crime news : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामनगरा (karnataka ramnagra crime) जिल्ह्यातील जोगनहल्ली गावात घडली आहे. एका व्यक्तीच्या फार्म हाऊसवर २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडली आहेत. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून हा व्यक्ति मंत्रतंत्र करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Vasant More: मर्यादेबाहेर त्रास सहन केला! आता ना तक्रार ना अपेक्षा; मध्यरात्री पोस्ट लिहीत वसंत मोरेंनी व्यक्त केली खदखद

कर्नाटकात नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका फार्म हाऊसमध्ये २५ मानवी कवटींसह शेकडो हाडे सापडली आहेत. हे पाहून स्थानिक नागरिकांसह अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. रिपोर्ट्सनुसार, बलराम नावाच्या व्यक्तीने त्यांना गुप्त पूजेसाठी गोळा केले होते. त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण होत आहे. रामनगर जिल्ह्यातील जोगनहल्ली गावात ही घटना उघडकीस आली आहे.

mission divyastra : काय आहे मिशन दिव्यास्त्र? ज्यामुळे पीएम मोदींनी केले डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन! वाचा

रविवारी रात्री जोगनहल्ली गावातील बलराम नावाचा व्यक्ती स्मशानभूमीत पूजा करत असताना गावकऱ्यांनी त्याला पाहिले. स्मशानभूमीत बलरामला असे पाहून घाबरलेल्या लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. स्मशानभूमीत एक व्यक्ती काळी जादू करत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अघोरी पूजा करणाऱ्या बलरामला अटक केली. त्याची चौकशी केली असतं अनेक खळबळजनक घटना समोर आल्या. पोलिसांनी बलरामच्या फार्म हाऊसवर जात तपास सुरू केला.

Maharashtra Weather update : राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट! विदर्भात पावसाची शक्यता; पुढील काही दिवस असे असेल हवामान

पोलिसांना सापडल्या मानवी कवट्या

झडतीदरम्यान पोलिसांना बलराम च्या फार्म हॉउसवर तब्बल २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडले. त्या कवटीवर हळद, कुंकू आणि पांढरे पट्टे लावण्यात आले होते. या कावट्यांचा वापर त्याने अघोरी पूजेसाठी केला असल्याचे तपासात पुढे आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा केले आहेत. या कवटीचे आणि हाडांचे वय निश्चित करण्यासाठी एफएसएल पथक देखील विशेष चाचण्या करत आहे. बलरामने हाडांची खुर्ची आणि पलंग तयार केल्याने अधिकारीही अवाक् झाले.

पोलिस तपासादरम्यान बलरामने सांगितले की, ही कवटी आणि हाडे त्याच्या पूर्वजांच्या काळातील आहेत, परंतु अधिकाऱ्यांना त्या चार ते पाच वर्षांपूर्वीच्या असल्याचा संशय आहे. या अस्थी त्यांनी स्मशानभूमीतून गोळा केल्याचं समजतं. बलरामने आपल्या जमिनीवर शेड बांधून त्याला 'श्री शमशान संहिता' असे नाव दिल्याचे तपासात उघड झाले आहे. स्मशानभूमीतून कवटी आणि हाडे आणल्याने तो तंत्रमंत्राचा अभ्यास करत होता, असे देखील तपसात पुढे आले आहे.

पुढील बातम्या