Maharashtra Weather update : राज्यात मोठ्या प्रमाणात हवामान बदल होतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यातून एकीकडे थंडी हळू हळू गायब होत असतांना आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या छत्तीसगडवर वाऱ्यांची परस्पर क्रिया म्हणजेच विंड इंटरॅक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ व १७ मार्चला विदर्भ व आजूबाजूच्या परिसरात हलक्या पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवमान कोरडे राहणार असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमान देखील स्थिर राहणार आहे.
राज्याच्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. गेल्या आठवड्यात राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे ढग पुन्हा घोंगावू लागले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात ३५ ते ३६ च्या पुढे गेले आहे. सध्या राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे. तर आकाश निरभ्र राहणार आहे. १५ तारखेनंतर विदर्भात पावसाची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यावर कुठलीही विशेष सिस्टीम नाही. वेळोवेळी अंशतः उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने राज्याच्या किमान तपमानात वाढ होणार नाही. राज्यात येणाऱ्या सदरली व साऊथ साऊथ ईस्टर्ली चक्रिय वाऱ्यांमुळे राज्याच्या आग्नेय भागात काही प्रमाणात आर्द्रता येत आहे. यामुळे राज्यात पुढचे काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
१५ मार्चनंतर विदर्भ पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या छत्तीसगडवर वाऱ्यांची परस्पर क्रिया म्हणजेच विंड इंटरॅक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ व १७ मार्चला विदर्भ व आजूबाजूच्या परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही शक्यता आहे.
पुण्यात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. १६ मार्च नंतर मात्र आकाश वेळोवेळी औषधांना ढगाळ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. किमान तापमानात १३ मार्च नंतर एक ते दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे तर कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही.
उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राजधानी दिल्लीत देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.