mission divyastra : भारताने सोमवारी मिशन दिव्यस्त्राची यशवी चाचणी घेतली. हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-५ क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल पीएम मोदींनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदनही केले आहे. एमआयआरव्ही (MIRV) तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रात एकाच वेळी अनेक आण्विक शस्त्रे वाहून नेली जाऊ शकतात. आणि अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ला करता येऊ शकतो. या प्रकल्पाची धुरा एका महिलेने सांभाळली आहे. या प्रकल्पात महिलांचेही मोठे योगदान आहे.
MIRV म्हणजे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल. मिशन दिव्यास्त्राच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, या क्षेपणास्तरातून एकाच वेळी विविध लक्ष्यावर मारा केला जाऊ शकतो. हे क्षेपणास्त्र कोठूनही डागता येते. आतापर्यंत अग्नी क्षेपणास्त्रात हे तंत्रज्ञान नव्हते. मात्र आता हे क्षेपणास्त्र अतिशय उच्च दर्जाच्या सेन्सरने सुसज्ज करण्यात आले आहे. अग्नि ५ या मिशन दिव्यास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर, भारत एमआयआरव्ही क्षमतेने सुसज्ज असलेल्या उच्चभ्रू देशांच्या यादीत सामील झाला आहे.
या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली. यासाठी त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल देशाला शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.