मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Murder Case : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; कौटुंबिक वादातून भाच्याची निर्घृण हत्या

Thane Murder Case : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; कौटुंबिक वादातून भाच्याची निर्घृण हत्या

Oct 25, 2022, 03:57 PM IST

    • Thane Crime News Marathi : यश घरातील भांडणं सोडवण्यासाठी गेला होता. परंतु आरोपी मामानं भाजी कापण्याच्या कोयत्यानंच त्याच्यावर वार केले. त्यामुळं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
Thane Crime News Marathi (HT_PRINT)

Thane Crime News Marathi : यश घरातील भांडणं सोडवण्यासाठी गेला होता. परंतु आरोपी मामानं भाजी कापण्याच्या कोयत्यानंच त्याच्यावर वार केले. त्यामुळं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

    • Thane Crime News Marathi : यश घरातील भांडणं सोडवण्यासाठी गेला होता. परंतु आरोपी मामानं भाजी कापण्याच्या कोयत्यानंच त्याच्यावर वार केले. त्यामुळं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

Thane Crime News Marathi : काही दिवसांपूर्वीच ठाण्यात एका तरुणीच्या विनयभंग करण्याचा प्रयत्न रिक्षाचालकानं केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता ऐन दिवाळीच्या रात्री कौटुंबिक वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. यश असं तरुणाचं नाव असून ऐन दिवाळीच्या दिवशीच त्याची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मानपाडा परिसरात राहणाऱ्या सतिश देसले आणि त्यांचे मेहूणे विनायक कुंडल यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. त्यावेळी सतिश देसले यांचा भाचा यश भांडणं सोडवण्यासाठी धावत आला. परंतु संतापलेल्या सतिश यांनी स्वत:च्याच भाच्यावर भाजी कापण्याच्या कोयत्यानं सपासप वार केले. त्यात यश गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिक लोकांनी हस्तक्षेप करत जखमी यशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं आहे.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर आरोपी सतिश देसले याला अटक करण्यात आली असून मृत यशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर आज पोलिसांनी आरोपी सतिशला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर...

काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या रेल्वे स्टेशनबाहेर उभी असलेल्या तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकानं केला होता. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी ठाण्यात एका तरुणाची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली होती. त्यातच आता ऐन दिवाळीच्या दिवशी मामानंच भाच्याची हत्या केल्यानं ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या