मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Crime News: क्षुल्लक कारणावरून गुप्तांगावर धारदार शस्त्रानं वार, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Sangli Crime News: क्षुल्लक कारणावरून गुप्तांगावर धारदार शस्त्रानं वार, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Sep 18, 2022, 08:51 AM IST

    • Sangli Crime News : पानपट्टीची तोडफोड केल्याचा केल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Sangli Crime News : पानपट्टीची तोडफोड केल्याचा केल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

    • Sangli Crime News : पानपट्टीची तोडफोड केल्याचा केल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Sangli Crime News Marathi : पानपट्टीची तोडफोड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाच्या तोंडावर आणि गुप्तांगावर वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं सांगलीत खळबळ उडाली असून आता या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्लेखोर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

मिळालेल्या माहितीनुसार, मयत जीलानी कुडचिकर याचे पानपट्टी तोडल्याच्या कारणावरून आरोपी गणेश खन्ना नायडूशी वाद झाले होते. त्यात दोघांमध्ये शिवीगाळ झाली. आणि संतापलेल्या आरोपी नायडूनं जीलानीच्या पोटावर, तोंडावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्रानं वार केले, त्यात जीलानी हे जखमी झाले. स्थानिकांना या हाणामारीची माहिती मिळताच त्यांनी हा वाद मिटवत जिलानी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु उपचारादरम्यान जिलानीचा मृत्यू झाला आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार...

या प्रकरणाची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारावर आरोपी गणेश खन्ना नायडू याला अटक केली. परंतु पोलीस ठाण्यात रेकॉर्ड तपासलं असता तो सराईत गुन्हेगार असल्याचं सिद्ध झालं आहे.

याआधी दरोडा, चोरी आणि हाणामारीच्या अनेक घटनांमध्ये तो आरोपी होता. त्यानंतर आता त्यानं एका तरुणाचा खून केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मयत जिलानीच्या कुटुंबियांनी केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या