मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palasdev Crime News : पैशासाठी मुलाचा जन्मदात्या आईवर प्राणघातक हल्ला; फरार आरोपीचा शोध सुरू

Palasdev Crime News : पैशासाठी मुलाचा जन्मदात्या आईवर प्राणघातक हल्ला; फरार आरोपीचा शोध सुरू

Oct 27, 2022, 10:04 AM IST

    • Palasdev Crime News : पेन्शनचे पैसे न दिल्यानं संतापलेल्या मुलानं आईवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Palasdev Indapur Pune Crime News (HT_PRINT)

Palasdev Crime News : पेन्शनचे पैसे न दिल्यानं संतापलेल्या मुलानं आईवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

    • Palasdev Crime News : पेन्शनचे पैसे न दिल्यानं संतापलेल्या मुलानं आईवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Palasdev Indapur Pune Crime News : आईला मिळालेल्या पेन्शनमधून पैसे न दिल्यानं संतापलेल्या मुलानं आईला लाकडी दांड्यानं मारहाण केल्याची घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. दिलीप जाधव असं आरोपीचं नाव असून आईवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर इंदापूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

थरकाप उडवणाऱ्या पुण्यातील कार Porsche Car अपघाताचा VIDEO व्हायरल; पाहून अंगावर काटा येईल

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील इंदापूर तालुक्यातल्या पळसदेव या गावातील रहिवासी असलेल्या वैजयंता जाधव यांना गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शन मिळते. परंतु या पेन्शनमधून आईनं पैसे द्यावेत, यासाठी मुलानं आईला अनेकवेळा मनधरणी केली होती. परंतु आईनं पैसे न दिल्यानं आरोपी मुलानं आईचा छळ करायला सुरुवात केली. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपी दिलीपनं आपल्या आई वैजयंता यांना पैशांसाठी शिवीगाळ करत लाकडी दांड्यानं मारहाण केली. याशिवाय डोक्यात लाकडी दांडा लागल्यानं वैजयंता या चक्कर येऊन खाली कोसळल्या.

त्यानंतर आई बेशुद्ध झाल्याचं समजताच आरोपी दिलीप घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर स्थानिकांनी ही घटना समजताच त्यांनी वैजयंता यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर आता त्यांच्या धाकट्या मुलानं आरोपी मोठ्या भावाविरोधात इंदापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर इंदापूर पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं आरोपी दिलीपवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. याशिवाय जखमी वैजयंता जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या