मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  lightning : वादळी पावसात वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्याल? हे उपाय करून राहा सुरक्षित

lightning : वादळी पावसात वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्याल? हे उपाय करून राहा सुरक्षित

Apr 18, 2024, 02:35 PM IST

    • What should be done to avoid lightning? : राज्यात गेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होऊन पाऊस पडत आहे. वीज कोसळल्यामुळे काही नागरिकांचा बळी देखील गेला आहे. त्यामुळे वीज अंगावर पडू नये यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती घेऊयात.
वादळी पावसात वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्याल? हे उपाय करून राहा सुरक्षित

What should be done to avoid lightning? : राज्यात गेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होऊन पाऊस पडत आहे. वीज कोसळल्यामुळे काही नागरिकांचा बळी देखील गेला आहे. त्यामुळे वीज अंगावर पडू नये यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती घेऊयात.

    • What should be done to avoid lightning? : राज्यात गेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होऊन पाऊस पडत आहे. वीज कोसळल्यामुळे काही नागरिकांचा बळी देखील गेला आहे. त्यामुळे वीज अंगावर पडू नये यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती घेऊयात.

What should be done to avoid lightning? : राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. एकीकडे उष्णतेची लाट आणि दुसरीकडे वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह पाऊस होत आहे. काही जिल्ह्यात वीज कोसळून नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात दरवर्षी वीज कोसळून नागरिकांचा आणि जनावरांचा मृत्यू होत असतो. त्यामुळे वादळी वारे सुरू असतांना बाहेर पडणे टाळावे. मात्र, तुम्ही जर बाहेर असाल आणि वादळी वारे होत असल्यास वीज अंगावर पडू नये याची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच वीज कोसळण्याची लक्षणे काय याची देखील माहिती असणे गरजेचे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

SC on EVM : ईव्हीएममधील घोळाच्या तक्रारीकडं लक्ष द्या; सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक आयोगाला सूचना

देशात विज कोसळून दरवर्षी मोठे नुकसान होत असल्याने या पासून खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या पासून कसे सुरक्षित राहावे या बाबतचे एक पत्रक जारी केले आहे. यात वीजेपासून स्वत:चा कसा बचाव करावा तसेच एखादा व्यक्ति जर वीज कोसळून जखमी झाला असून तर त्यावर कसे उपचार करावे याची माहिती देण्यात आली आहे.

जर वादळी वारे आणि वीजांचा कडकडाट होत असेल तर अशा स्थितीत घराबाहेर पडू नये. जर तुम्ही घराबाहेर असाल तर सुरक्षित स्थळी जाणे हा त्यावरचा उपाय आहे. खास करून एखाद्या बंद इमारतीत, घरात किंवा गुहा सदृश्य ठिकाणी तुम्ही आसरा घेऊ शकतात. हे ठिकाण सुरक्षित मानले जाते. जर तुम्हाला अशी जागा सापडली नाही तर उंच असलेल्या ठिकाणी थांबणे टाळा. विशेष करून विद्युत पोल, झाडे, पत्र्याचे शेड या ठिकाणी जाणे टाळावे. कारण या गोष्टी विजेला स्वत:कडे आकर्षित करत असतात.

gst on laccha paratha : लच्छा पराठ्यावरील कराचा वाद थेट हायकोर्टात! न्यायाधीशांनी दिला 'हा' निर्णय

जर हेही शक्य नसेल किंवा तुम्ही शेतात काम करत असाल तर वेळ न घालवता तुम्ही दोन्ही पाय हे गुडघ्याजवळ घेऊन खाली बसून हात कानावर ठेवा, असे करतांना तुमचा संपर्क हा जमिनीशी कमीत कमी यावा याची खबरदारी घ्या.

वादळी वारे सुरू असतांना, घरांच्या खिडक्या, दरवाजे बंद करा तसेच घरातील विद्युत उपकरणे देखील बंद करून ठेवा. जर तुम्ही कारमध्ये असाल तर गाडीच्या काचा देखील बंद करून ठेवा.

जर तुम्ही बाहेर असाल आणि तुमच्या अंगावरील केस उभे राहिले असल्याचे तुम्हाला जाणवत असल्यात किंवा शरीरात विद्युत प्रभार, त्‍वचेला मुंग्‍या येणे, झिणझिण्‍या जाणवल्यास तुमच्यावर वीज कोसळू शकते. अशावेळी जमिनीवर झोपावे किंवा डोके गुडघ्यात घालून खाली बसा.

प्रामुख्याने धातुंच्‍या वस्‍तूंपासून दूर राहा. तर धरणे, तलाव व इतर पाण्याच्या ठिकाणांपासून देखील लांब राहा. वीजा चमकत असतांना मोबाईल फोनचा वापर टाळा. जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. दुचाकी, ट्रॅक्टरमध्ये असाल तर तातडीने प्रवास थांबवावा आणि सुरक्षित ठिकाणी जावे.

लता-रफीचे सूर अन् शंकर-जयकिशन यांच्या सुरावटींची 'अजीब दास्तां' रंगणार! कधी आणि कुठे? वाचा!

घरात असल्यास ही काळजी घ्या

वादळी वारे सुरू असल्यास आधी घराचे दरवाजे नीट बंद करून घ्या. यावेळी घराबाहेर पडणे टाळा. घराच्या खिडक्या, दारे या पासून लांब राहा. टीव्ही, विद्युत उपकरणे वापरू नका. विजा चमकत असतांना घरात हेयरड्रायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर ही विद्युत उपकरणे वापरणे टाळा. टेलिफोन आणि मोबाइल वापरणे देखील टाळा. जर पाणी वाहते असेल तर त्याच्या संपर्कात येऊ नका.

वीज पडून जखमी व्यक्तीवर कसे उपचार करायचे?

वीज पडून एखादा व्यक्ति जखमी झाल्यास त्याला तातडीने उपचार द्या. अशा व्यक्तीला स्पर्श करणे सुरक्षित असते. वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा श्वास सुरू आहे की नाही हे तपासा. जर त्या व्यक्तीचा श्वास थांबला असेल तर त्याला तोंडावाटे कृत्रिम श्वासोच्छवास द्या. जर हृदयाचे ठोके थांबले असल्यास त्याला कार्डिआक कॉम्प्रेशन द्या म्हणजेच छातीवर दाब देऊन हलके झटके मारा. तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन जा.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या