मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कलाटेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; चिंचवडमधील आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

कलाटेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; चिंचवडमधील आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

Feb 21, 2023, 04:10 PM IST

    • Chinchawad Bypoll Election : राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी पक्षातील आठ पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) chief Uddhav Thackeray (PTI)

Chinchawad Bypoll Election : राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी पक्षातील आठ पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

    • Chinchawad Bypoll Election : राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी पक्षातील आठ पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

Chinchawad Pune Bypoll Election : पुण्यातील चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तारीख जवळ आलेली असतानाच आता उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळण्यासाठी आणि पक्षातील बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी मोठी खेळी केली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी चिंचवडमधील आठ पदाधिकाऱ्यांची शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून हकालपट्टी केली आहे. राहुल कलाटे यांचा मतदानापूर्वी जोर वाढत असतानाच ठाकरेंनी त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळं महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिंचवडचे उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर, रवी घटकर, चिंचवड विधानसभेच्या महिला संघटक अनिता तुतारे, शहर संघटक रजनी वाघ आणि विभाग संधटक शिल्पा आनपान या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळं आता अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मोठा धक्का बसला आहे. राहुल कलाटे हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. कलाटेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीविरोधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदार पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून आश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि मविआतून बंडखोरी करत अर्ज दाखल करणारे राहुल कलाटे हे रिंगणात आहेत. चिंचवडचं मैदान मारण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीनं आपापल्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा मतदारसंघात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता चिंचवडच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

पुढील बातम्या