मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? पुढील दोन दिवस 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? पुढील दोन दिवस 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Apr 03, 2024, 10:43 AM IST

  • Mumbai Pune expressway mega block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज बुधवारी आणि गुरुवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात या मार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय ? पुढील दोन दिवस 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Mumbai Pune expressway mega block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज बुधवारी आणि गुरुवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात या मार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे

  • Mumbai Pune expressway mega block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज बुधवारी आणि गुरुवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात या मार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे

two hour traffic block on the mumbai pune expressway : राज्यातील सर्वाधिक व्यस्त महामार्ग असणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे जर आज आणि उद्या या महामार्गाने जर तुमच्या प्रवासाचे नियोजन असेल तर ही बातमी महत्वाची आहे. आज बुधवार आणि गुरुवारी या मार्गवार २ तासांचा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या काळात या मार्गावरची वाहतूक ही वळवण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव! कपड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील ७ ठार

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नवी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. या साठी या मार्गावर वारंवार ब्लॉक घेतला जातो. याच हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीचे काम करण्यासाठी मुंबई व पुणे वाहिनीवर कि.मी. ९३/९०० येथे ३ व ४ एप्रिलला दुपारी १२ ते २ या दरम्यान गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. यामुळे गॅन्ट्री बसविताना मुंबई व पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक या काळात पूर्णतः बंद राहणार आहे.

PCMC News : धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलले

यामुळे या काळात पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. द्रुतगती मार्गावरुन पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही किवळे ब्रिज वरून वळवून जुना मुंबई - पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात आली आहे. तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कुसगाव टोलनाका कि.मी ५५.००० वरुन (लोणावळा एक्झीट) येथून जुना मुंबई -पुणे मार्गावरुन पुण्याच्या दिशेने वळवण्यात आली आहे, अशी माहिती, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम या मार्गावर बसवण्यात येत आहे. तब्बल ३४० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

पुढील बातम्या