मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PCMC News : धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलले

PCMC News : धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 03, 2024 07:23 AM IST

PCMC Crime News : पुण्यात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी-चिंचवड येथे एका ३ वर्षीय मुलाला काही अल्पवयीन मुलांनी विहीरत ढकलुन दिल्याने खबळल उडाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलले
पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलले

PCMC Chikhli Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात चिखली येथे काही अल्पवयीन मुलांनी मिळून एका तीन वर्षांच्या चिमूकल्याला विहिरीत ढकलून दिले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घातस्थळी धाव घेतली असून अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या या लहान मुलाचा शोध सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव! कपड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील ७ ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसीम नाज्जीमुद्दीन खान असे विहिरीत ढकललेल्या तीन वर्षीय मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत वसिमचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली असून मंगळवारी ही घटना उघडकीस आली. वसिम हा काही मोठ्या अल्पवयीन मुलांशी खेळत होता. यावेळी काही अल्पवयीन मुलांनी त्याला विहिरीत ढकलुन दिले. पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी गेल्या २१ तासांपासून विहीरत वसिमचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बरसणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम व त्याचे काही मित्र घराजवळ असणाऱ्या एका विहिरीजवळ खेळत होती. खेळता खेळता काही मुलांनी वसीमला थेट विहिरीत ढकलले. वसिम विहिरीत पडल्याने मुले घाबरली. त्यांनी याची माहिती वसिमच्या घरच्यांना संगीतली. वसिम विहिरीत पडल्याचे समजताच घरातील नागरिक हादरले.

त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करत वसिम पडलेल्या विहीरीत त्याचा शोध घेण्यात येत आहे. सर्व मुले ही रोज प्रमाणे खेळात होती. वसिम देखील खेळून घरी येईल या आशेत असतांना खान कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांनी वसीमचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला असून यामुळे खान कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

IPL_Entry_Point