Chhatrapati Sambhajinagar fire: छत्रपती संभाजी नगर येथून वाईट बातमी पुढे येत आहे. आज पहाटे ३ च्या सुमारास छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानात वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत तीन महिला, दोन मुळे आणि आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दुकान छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असून एका तीन मजली इमारतीत आहे.
हमीदा बेगम (वय ५०), शेख सोहेल (वय ३५), वसीम शेख (वय ३०), तन्वीर वसीम (वय २३), रेश्मा शेख (वय २२), आसिम वसीम शेख (वय ३), परी वसीम शेख (वय २) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या इमारतीत एकूण १६ जण राहात होते. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते.
या इमारतीला पहाटे ३ च्या सुमारास अचानक आग लागली. कपड्याचे दुकान असल्याने आग काही वेळातच पसरली. यात दुकानात वरच्या मळ्यात झोपलेले असळेले एकाच कुटुंबातील सात जण होरपळून ठार झाले. पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सर्व मृतदेह अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले असून हे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंगचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास पोलिस करत आहेत.