मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fauzia Khan Home Cidco : खासदार फौजिया खान यांच्या घरात चोरी, औरंगाबादेत खळबळ; चोरट्यांचा तपास सुरू

Fauzia Khan Home Cidco : खासदार फौजिया खान यांच्या घरात चोरी, औरंगाबादेत खळबळ; चोरट्यांचा तपास सुरू

Oct 19, 2022, 11:17 AM IST

    • Cidco Aurangabad Crime News : राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबादेतील घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा तपास बेगमपूरा पोलिसांनी सुरू केला आहे.
Cidco Aurangabad Crime News (HT)

Cidco Aurangabad Crime News : राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबादेतील घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा तपास बेगमपूरा पोलिसांनी सुरू केला आहे.

    • Cidco Aurangabad Crime News : राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबादेतील घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा तपास बेगमपूरा पोलिसांनी सुरू केला आहे.

Cidco Aurangabad Crime News : राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबादेच्या सिडकोतील घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आता बेगमपूरा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सणासुदीच्या काळात एका खासदाराच्याच घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांचं औरंगाबादेतील सिडको एन-१३ परिसरात निवासस्थान आहे. मध्यरात्री एका चोरट्यानं मागच्या दाराचं कुलूप तोडून खासदार फौजिया खान यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यानं पाच भांडी आणि तीन हजार रुपयांची कॅश चोरून नेली आहे. या प्रकरणाची माहिती खासदार खान यांच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी याबाबात बेगमपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू केला आहे.

सणासुदीत शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर...

दिवाळीच्या सणासाठी अनेक लोक हे औरंगाबाद शहरातून गावाकडे जात असतात. दिवाळीच्या सणांसाठी लोक घरं बंद करून गावाकडे जात असल्यानं अनेक चोरीच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळं आता रात्रीच्या वेळी शहरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात बाहेरच्या राज्यातून अंमली पदार्थ आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीलाही अटक केली होती. त्यानंतर आता चक्क एका खासदाराच्याच घरात चोरी झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या