मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Panvel Suicide: लग्नास नकार दिल्याने पनवेलच्या आदिवासी पाड्यावरील प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Panvel Suicide: लग्नास नकार दिल्याने पनवेलच्या आदिवासी पाड्यावरील प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Jan 23, 2023, 08:09 AM IST

    • Panvel Suicide: पनवेल प्रेमी युगलाच्या आत्महतेने हादरले आहे. लग्नाला नकार दिल्याने दोघांनी विष घेत आत्महत्या केली आहे.
Panvel Suicide

Panvel Suicide: पनवेल प्रेमी युगलाच्या आत्महतेने हादरले आहे. लग्नाला नकार दिल्याने दोघांनी विष घेत आत्महत्या केली आहे.

    • Panvel Suicide: पनवेल प्रेमी युगलाच्या आत्महतेने हादरले आहे. लग्नाला नकार दिल्याने दोघांनी विष घेत आत्महत्या केली आहे.

पनवेल : घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने पनवेलमधील तावरवाडी येथील आदिवासी पाड्यावरील एका तरुणाने आणि अल्पवयीन मुलीने जंगलात जाऊन विष घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, विष घेण्यापूर्वी मुलीने आईला फोन करत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पनवेलमधील तावरवाडी येथील आदिवासी पड्यावर हे दोघे राहतात. दोघेही नात्यात आहेत. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. दरम्यान दोघेही शुक्रवारी रात्री ही मित्राकडे टीव्ही पाहण्यास जातो असे सांगून घराबाहेर पडले. मात्र, ते घरी न आल्याने घरंच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास मुलीने तरुणाच्या फोनवरुन तिच्या आईला फोन केला आणि आपण कीटकनाशक घेतले असून घरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या जंगलात असल्याची माहिती दिली. दरम्यान, घरच्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. तब्बल दोन तासानंतर दोघेही जंगलात शुद्ध हरपलेल्या अवस्थेत आढळले. घरच्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या बाबत माहिती देतांना पोलिस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण ते नात्यात होते. घरचे त्यांच्या नात्याला मान्यता देणार नाही याची जाणीव त्यांना होती. यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. जर दोघे लवकर सापडले असते तर त्यांचा जिव वाचला असता असे देखील पाटील म्हणाले. घटनास्थली कीटकनाशक सापडले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या