मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai local mega block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा! ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai local mega block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा! ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक

Mar 30, 2024, 07:16 AM IST

    • Mumbai Sunday local mega block : रविवारी मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आल्याने काही लोकल (Mumbai Local) रद्द करण्यात आल्या आहेत. 
रविवारी मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्याने काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Sunday local mega block : रविवारी मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आल्याने काही लोकल (Mumbai Local) रद्द करण्यात आल्या आहेत.

    • Mumbai Sunday local mega block : रविवारी मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आल्याने काही लोकल (Mumbai Local) रद्द करण्यात आल्या आहेत. 

Mumbai Sunday local mega block : रविवारी मुंबईत देखभाल (Mumbai Local) दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आल्याने काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या उशिराने धावणार आहेतत्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

Mumbai Crime News: विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

Narendra Dabholkar Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंनिस अन् दाभोलकर कुटुंबियांची भूमिका

Weather Update: मुंबईत ४ ते ५ दिवस अवकाळीची शक्यता; पुणे, संभाजीनगर, सांगली , नगरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले

Maharaashtra Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

असा असेल मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत रहाणार आहे. या काळात माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांत थांबणार आहेत. नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार या स्थानकांत लोकलचा थांबा नसल्याने येथील प्रवाशांचे ब्लॉककाळात हाल होण्याची शक्यता असल्याने या वेळापत्रकाची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bullet Train : बुलेट ट्रेनबाबत खुशखबर! रेल्वेमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करत दिली मोठी अपडेट

हार्बर मार्गावर पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत राहणार असून या काळात सीएसएमटी – बेलापूर / पनवेल लोकल सेवा आणि पनवेल – ठाणे लोकल रद्द करण्यात आली असून ब्लॉककाळात सीएसएमटी – वाशी, ठाणे – वाशी / नेरुळ, बेलापूर / नेरुळ ते उरण लोकल सेवा सुरू राहणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार असून सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. या काळात चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर धावणार आहेत. यामुळे अप आणि डाऊन दिशेकडील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही चर्चगेट लोकल वांद्रे आणि दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

पुढील बातम्या