मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  solapur highest temperature : देशातील सर्वाधिक हॉट शहरांमध्ये सोलापूर; ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानची नोंद

solapur highest temperature : देशातील सर्वाधिक हॉट शहरांमध्ये सोलापूर; ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानची नोंद

Apr 06, 2024, 06:36 AM IST

    • solapur temperature highest in country: राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आग ओकत आहे. तापमानात (temperature) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक शहरातील तापमानाने ४० ओलांडली आहे.
देशातील सर्वाधिक हॉट शहरांमध्ये सोलापूरचा समावेश; ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानची नोंद (Pixabay )

solapur temperature highest in country: राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आग ओकत आहे. तापमानात (temperature) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक शहरातील तापमानाने ४० ओलांडली आहे.

    • solapur temperature highest in country: राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आग ओकत आहे. तापमानात (temperature) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक शहरातील तापमानाने ४० ओलांडली आहे.

Solapur temperature highest in country : राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आग ओकत आहे. तापमानात (temperature) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक शहरातील तापमानाने ४० ओलांडली आहे. नागरिक उन्हामुळे त्रस्त असतांना देशभरात सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांच्या यादीत राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या समावेश झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आंध्र प्रदेशातील रायलसीमा भाग देशात सर्वाधिक गरम ठिकाण ठरला आहे, येथील नंद्याल शहरात ४३.७ डिग्री सेल्सिअस तापनाची नोंद झाली. दरम्यान हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! उष्णतेच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाची शक्यता; गुडीपाडव्याला हलक्या सरी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मोठ्या प्रमाणात ऊन वाढले आहे. उन्हामुळे जिवाची लाही लाही होत आहे. अशातच आता राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात बऱ्याच जिल्ह्यांचे तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

MNS Padwa Melava: मनसे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे. सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर मराठवाडय़ात पुढील तीन दिवस रात्री नागरिकांना उकाडा सहन करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. बहुतांश जिल्ह्यातील पारा हा पुढील दोन दिवस ४० अंशांवरच राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

Hardik Pandya : हार्दिक पंड्यानं सोमनाथ मंदिरात घातलं साकडं, आता ट्रोलिंग बंद होणार?

राज्यात शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ४० डिग्री सेल्सिअसवर होते. विदर्भात तापमान ४२ अंशांवर होते. मराठवाडय़ात देखील सरासरी तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. राज्यात पुढील काही दिवस कोरडे हवामान राहणार आहे. कोकण आणि गोवा तसेच किनारपट्टीच्या भागात कमाल तापमान ३२ अंश नोंदवण्यात आले. गुरुवार पेक्षा शुक्रवारी तापमान वाढल्याचे आढळून आले. शुक्रवारी अलिबागमध्ये ३.४, डहाणूत १.६, कुलाब्यात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले.

विदर्भात तापमानात किंचित घट 

विदर्भात शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात सरासरी ०.५ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे आढळले. तर आज शनिवारी मात्र तापमान वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी व सोमवारी विदर्भात गारपीट होण्याचा, आणि मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या बहुतेक भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना, आणि वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाऊस झाल्यास नागरिकांना उकाड्या पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या