आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खूपच खराब कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्हीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार आता देवाच्या चरणी पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या चाहत्यांच्या प्रचंड विरोधाचा आणि ट्रोलिंगचाही सामना करत आहे. रोहित शर्माच्या जागी पंड्याला कर्णधार बनवल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज आहेत.
दरम्यान, आता हार्दिक पंड्या गुजरातमधील सोमनाथ मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनासाठी पोहोचला होता. सोमनाथ मंदिर ट्रस्टने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पंड्या दर्शन घेताना दिसत आहेत.
१ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला दीर्घ विश्रांती मिळाली आहे. मुंबईला त्यांचा पुढचा सामना ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. महादेवाचे दर्शन घेतल्याने आता पंड्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.
आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केले आणि रोहित शर्माच्या जागी संघाचा कर्णधार बनवले. यानंतर चाहते प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी प्रत्येक सामन्यात हार्दिक पंड्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुंबई इंडियन्सच्या गेल्या तिन्ही सामन्यात चाहत्यांनी हार्दिकला टार्गेट केले होते.
अशा कठीण टप्प्यातून जात असलेला कर्णधार हार्दिक पंड्या शुक्रवारी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पोहोचला. येथे त्याने भगवान शंकराची पूजा केली. पंड्याने सोमनाथ मंदिरात पूजा करून संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. मंदिरात पूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्या आयपीएलच्या १७ व्या हंगामात तीन सामने खेळला आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकूण ६९ धावा झाल्या आहेत. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या ३४ आहे. त्याचबरोबर गोलंदाजी करताना तो आतापर्यंत केवळ १ बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे.
संबंधित बातम्या