मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Mar 10, 2024, 09:54 PM IST

  • Ravindra Waikar Joins Shivsena Shinde Group :उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आमदार रवींद्र वायकरांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ravindra Waikar Joins Shivsena Shinde Group :उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

  • Ravindra Waikar Joins Shivsena Shinde Group :उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतले.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवसस्थान वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वायकर रविवारी सायंकाळी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदाराने साथ सोडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर म्हणाले गेल्या ५० वर्षापासून मी शिवसेनेत जे पडेल ते काम केलेलं आहे. चार वेळा नगरसेवक, तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मी आता पक्षप्रवेश करतोय, त्या मागचं कारण वेगळ आहे. देशात भाजपची सत्ता असून पंतप्रधान मोदी तसेच राज्यात मुख्यमंत्री शिंदे चांगलं काम करत आहेत. सर्व विकासकामांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इकडे आलोय. नाही सोडवले तर, मग मी लोकांना उत्तर देऊ शकणार नाही. यासाठीच मी येथे आलो आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रवींद्र वायकर यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ही चौकशी सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर वायकर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर रवींद्र वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या