मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aditya Thackeray : दिशा पटानीसोबत अफेयरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

Aditya Thackeray : दिशा पटानीसोबत अफेयरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

Feb 21, 2023, 07:19 PM IST

    • Aditya Thackeray Love Story : दिशा पटानीसोबत अफेयर्सच्या चर्चांवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच रोखठोकपणे भाष्य केलं आहे.
Aditya Thackeray And Disha Patani Love Story (HT)

Aditya Thackeray Love Story : दिशा पटानीसोबत अफेयर्सच्या चर्चांवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच रोखठोकपणे भाष्य केलं आहे.

    • Aditya Thackeray Love Story : दिशा पटानीसोबत अफेयर्सच्या चर्चांवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच रोखठोकपणे भाष्य केलं आहे.

Aditya Thackeray And Disha Patani Love Story : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आदित्य ठाकरे आणि दिशा पाटनी हे अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आल्यामुळं त्यांच्या अफेयर सुरू असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. परंतु दोघांनीही अद्याप या प्रकरणात कधीही भाष्य केलं नव्हतं. परंतु आता आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत दिशा पटानीसोबत काय नातं आहे, याचा खुलासा केला आहे. त्यामुळं आता त्यावरून पुन्हा सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी 'कर्ली टेल्स'च्या संडे ब्रंचला भेट देत मुलाखत दिली. त्यात त्यांनी दिशा पाटनीशी असलेल्या संबंधांवर जाहीरपणे भाष्य केलं आहे. 'कर्ली टेल्स'च्या कामिया जानी यांनी आदित्य यांना मुलाखतीत 'बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर तुमचं नाव जोडलं गेलं त्या अफवा होत्या, त्या खऱ्या असत्या तर?', असा सवाल केला. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, नाही, असं काहीही नाहीये. त्या सगळ्या अफवाच आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्री माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळं आता आदित्य ठाकरे यांनी दिशा पाटनीसोबत कोणतंही अफेयर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंनी ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील जीवन, लाईफस्टाईल, खाद्यसंस्कृती, प्रदूषण, आहार, लहानपणाच्या आठवणी आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहासावर रोखठोकपणे भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीमुळंच चर्चेत आलेलं नाही. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियन आत्महत्येप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते.

पुढील बातम्या