मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Cash Seized: नागपूरमध्ये १० लाखांची रोकड जप्त, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची धडक कारवाई

Nagpur Cash Seized: नागपूरमध्ये १० लाखांची रोकड जप्त, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची धडक कारवाई

Apr 11, 2024, 10:29 AM IST

    • Cash Seized In Nagpur: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथक सतर्क झाले असून नागपूर येथे १० लाख ३५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली.

Cash Seized In Nagpur: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

    • Cash Seized In Nagpur: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

Lok Sabha Elections 2024: भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) देशात १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होईल आणि ४ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा करीत आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू केली. तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. आचारसंहिता काळात ५० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. यातच भरारी पथकाने नागपूरमध्ये (Nagpur) लाखोंची रोकड जप्त केल्याची माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Mumbai: मुंबईत चोरी करून विमानानं गाव गाठायचा, आसाम येथील फ्लाईंग चोर 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी आणि नागपूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने एकूण 10 लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. नागपूर चंद्रपूर महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीतून रोकड जप्त केली. ही रोकड कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती, याचा पोलीस तपास करीत आहेत. याचा आगामी लोकसभा निवडणुकीशी काही संबंध आहे का? हे देखील पाहिले जात आहे.

Maharashtra Weather Updates: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोग सतर्क झाले आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवर आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर तीन पथक तैनात करण्यात आले आहे.

पुण्यात ६५ लाखांची रोकड जप्त

पुण्यात एकूण ६५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भोसरी आणि शिरूर येथे खाजगी वाहनातून रोकड घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही वाहनांची तपासणी केली. भोसरी पोलिसांनी एका फॉरच्यूनर गाडीतून १३ लाख ९० हजार ५०० रुपये जप्त केले. तर, शिरूर पोलिसांना एका वाहनात ५१ लाख १६ हजारांच्या नोटा मिळाल्या. प्राप्तीकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताची गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या