Cyber Crime : आईच्या मोबाईलवर गेम खेळताना तरुणानं चुकून एका लिंकवर क्लिक केलं अन् जीव गमावून बसला-nalasopara crime news 18 years old boy suicide due to fraud of 2 lakhs through mobile phone ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cyber Crime : आईच्या मोबाईलवर गेम खेळताना तरुणानं चुकून एका लिंकवर क्लिक केलं अन् जीव गमावून बसला

Cyber Crime : आईच्या मोबाईलवर गेम खेळताना तरुणानं चुकून एका लिंकवर क्लिक केलं अन् जीव गमावून बसला

Apr 11, 2024 12:10 AM IST

Nalasopara Crime News : आईच्या मोबाईलवर गेम खेळताना चुकून एक लिंक ओपन झाली आणि सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील दोन लाख रुपये लंपास केले. यामुळे १८ वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे.

ऑनलाईन गेम खेळताना बँक खात्यातील २ लाख रुपये उडवले
ऑनलाईन गेम खेळताना बँक खात्यातील २ लाख रुपये उडवले

अनेक जणांना मोबाईवर गेम खेळण्याचा प्रचंड नाद असतो. घरात, बसमध्ये इतकंच कशाला टॉयलेटमध्येही काही जण मोबाईलवर गेम खेळत बसतात. मात्र गेम खेळताना ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत. ऑनलाईन गेम खेळताना कोणती तरी लिंक ओपन झाली तर तुमच्या बँक खात्यातील रक्कम उडालीच म्हणून समजा. असाच प्रकार नालासोपारा येथे घ़डला आहे. ऑनलाईन गेम खेळताना बँक खात्यातून चक्क दोन लाख रुपये क्षणात उडाले. या ऑनलाईन फसवणुकीमुळे घाबरलेल्या व आईला काय उत्तर द्याचे या भीतीतून एका १८ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. 

मिळालेल्या माहितीनुसार कॉलेजला सुट्टी पडल्याने तरुणाने गेम खेळण्यासाठी आईचा मोबाईल घेतला होता. आईच्या मोबाईलवर गेम खेळताना अनेक लिंक येत होत्या. त्यातील चुकून एक लिंक ओपन झाली आणि सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील दोन लाख रुपये लंपास केले. ही गोष्ट आई-वडिलांना समजल्यास तर ओरडतील, या भीतीपोटी तरुणाने विषप्राशन करून आपले आयुष्य संपवले. मृत तरुणाने अकरावीची परीक्षा दिली होती.

तरुणाने आईचा मोबाईल घेतला होता. हा मोबाईल नंबर वडिलांच्या बँक खात्याला लिंक होता. गेम खेळताना एक फसवी लिंक आली होती. त्यावर चुकून क्लिक करताच सायबर भामट्यांनी वडिलांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये उडवले. वडिलांना ही गोष्ट समजली तर ते ओरडतील,  मारतील या भीतीने तरुणाने कीटकनाशक प्यायले. त्याला छातीत दुखू लागल्यानंतर कुटूंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत आचोळे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बँक खात्याशी लिंक असलेले मोबाईल पालकांनी लहान मुलांकडे देणे टाळले पाहिजे. तसेच बँक खाते ॲपला पासवर्ड, फेस आयडी व लॉक ॲप वापरण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

टॉवेलने तोंड दाबून आईने घेतला पोटच्या २ मुलांचा जीव!

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघकडीस आली आहे. काही दिवसापूर्वी दोन लहान मुलांचा गूढरित्या मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यूचा उलगडा झाला आहे. प्रेमात अडसर ठरत असल्याने आईनेचे आपल्या पोटचा दोन मुलांचे तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Whats_app_banner
विभाग