मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivneri Shiv Jayanti : किल्ले शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव! पोलिसांचा चोख बंदोबस्त, असा आहे कार्यक्रम

Shivneri Shiv Jayanti : किल्ले शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव! पोलिसांचा चोख बंदोबस्त, असा आहे कार्यक्रम

Feb 19, 2024, 08:18 AM IST

    • Shivneri Shiv Jayanti : आज किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून गडावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Shivneri Shiv Jayanti

Shivneri Shiv Jayanti : आज किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून गडावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    • Shivneri Shiv Jayanti : आज किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून गडावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Shivneri Shiv Jayanti : किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव सोहळा थाटामाटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. याची जय्यत तयारी गडावर करण्यात आली आहे. यंदा हा सोहळा दरवर्षी प्रमाणे लांबणार नसून सकाळी लवकर सोहळ्याला सुरुवात करून तो आटोपता घेतल्या जाणार आहे. यानंतर १० वाजल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना गडावर सोडण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. या सोहळ्यानिमित्त गडावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ७.४५ मिनिटांनी गडावर हेलिकॉप्टर द्वारे आगमन होणार आहे. यानंतर सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

chandrayaan 4 : चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर आता इस्रो चंद्रावरून माती आणण्याच्या तयारीत

किल्ले शिवनेरीवर आज शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गडावर होणारी गर्दी पाहता येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात अल आहे. तब्बल अकराशे पोलीस आणि होमगार्डचा गडावर तैनात करण्यात आले आहे. शिवाय गडावर येणाऱ्या नागरिकांची संख्या बघता पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

या वर्षी सकाळी हा कार्यक्रम सकाळी लवकर सुरू केला जाणार आहे. सकाळी ७.४५ ला हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किल्ले शिवनेरीवर येणार आहेत. यानंतर ८ वाजता शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम १० वाजेपर्यंत संपवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यानंटर सर्वसामान्य नागरिकांना गडावर प्रवेश दिला जाणार आहे. गडावरील शिवजंतीचा पाळणा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होत असते. यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. ही सभा गडावर शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडे घेतली जाणार असून या साठी पुरातत्व विभागाने परवानगी देखील दिली आहे.

गडावर विविध कार्यक्रम

जुन्नर शहरात गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही ३९४ वी जयंती आहे. यामुळे राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ 'चे आयोजन केले आहे. यात पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच बरोबर हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्रि मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या