मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal: मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण...; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal: मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण...; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Feb 03, 2024, 08:07 PM IST

    • Chhagan Bhujbal Resign: ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबर २०२३ ला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal Resign: ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबर २०२३ ला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.

    • Chhagan Bhujbal Resign: ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबर २०२३ ला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.

Chhagan Bhujbal Resigned From Maharashtra Cabinet: ओबीसी नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ओबीसींच्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना यावर न बोलण्यास सांगितले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी ओबीसींच्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करण्याच्या एक दिवस अगोदरच मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर न बोलण्यास सांगितले होते, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. "मी यावर मौन बाळगले, पण ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असे काही लोक म्हणत आहेत. मी मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार", असाही भुजबळ यांनी इशारा दिला आहे. भुजबळांच्या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

Ganpat Gaikwad Firing: भाजप आमदार गणपत गायकवाडला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. छगन भुजबळ म्हणाले की, “३६० कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड तयार केला जात आहे. नोंदीमध्ये खाडाखोड केली जात आहे. सगेसोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली तर ओबीसींचे आरक्षण संपवून जाईल, असे हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. मागासवर्गीय आयोगाचा सर्वे सुरु आहे, तो खोटा आहे.”

मराठा आरक्षणावरून ठिकठिकाणी मराठ्यांकडून ओबीसींना लक्ष्य करुन मारहाण करण्यात येत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले होते. दुर्देवाने, पोलीस ही परिस्थिती हाताळण्यात मागे पडत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या