Ganpat Gaikwad Firing: भाजप आमदार गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganpat Gaikwad Firing: भाजप आमदार गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Ganpat Gaikwad Firing: भाजप आमदार गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Feb 03, 2024 10:20 PM IST

Ganpat Gaikwad Sent Police Custody: उल्हासनगर गोळीबारप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाडला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली.

Ganpat Gaikwad Shoot
Ganpat Gaikwad Shoot

BJP MLA Ganpat Gaikwad held For Shooting: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे राज्यातील राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाडसह तिघांना अटक केली. गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.

उल्हासनगर गोळीबारप्रकरणी एकूण पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सरवणकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३०७ आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हा महिनाभरापासून सुरू असलेल्या जमिनीच्या प्रकरणात तक्रार देण्यासाठी शुक्रवारी आपल्या कार्यकर्त्यांसह हिल लाइन पोलीस ठाण्यात आला होता. त्याचवेळी महेश, पाटील व चैनू जाधव हे देखील आपल्या समर्थकांसह पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर गणपत गायकवाड देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले. उल्हासनगरमधील हिल लाइन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाच्या दालनात गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री महेश यांच्यावर गोळीबार केला. भाजप आमदार आणि शिवसेना नेते यांच्यात झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला.

शनिवारी पत्रकारांशी बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, आपल्या मुलाला मारहाण होत असल्याने त्याने महेशवर गोळीबार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात गुन्हेगारांचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर