मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘माझा बॉस 'सागर’ बंगल्यावर बसलाय! पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत'

‘माझा बॉस 'सागर’ बंगल्यावर बसलाय! पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत'

Jan 28, 2024, 08:14 AM IST

  • Nitesh Rane speech in Hindu Akrosh Morcha at Malshiras : भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी सोलापुरातील माळशिरस इथं हिंदू आक्रोश मोर्चासमोर बोलताना पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Nitesh Rane

Nitesh Rane speech in Hindu Akrosh Morcha at Malshiras : भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी सोलापुरातील माळशिरस इथं हिंदू आक्रोश मोर्चासमोर बोलताना पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

  • Nitesh Rane speech in Hindu Akrosh Morcha at Malshiras : भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी सोलापुरातील माळशिरस इथं हिंदू आक्रोश मोर्चासमोर बोलताना पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Nitesh Rane speech in Malshiras : ‘यापुढं कोणी वाकड्यात गेल्यास सरळ कार्यक्रम करून टाका. पोलीस आमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय…’ 

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

हे विधान आहे गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरणारे भाजपचे आमदार नीतेश राणे यांचं. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

धर्मांतरबंदी, लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी व वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नीतेश राणे व महेश लांडगे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तहसील कार्यालयावर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाला संबोधित करताना नीतेश राणे यांनी चिथावणीखोर भाषण केलं.

Pankaja Munde : आता एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणा... पंकजा मुंडेंचा मनोज जरांगेंना सल्ला

‘आपण इतर धर्मीयांच्या सणांमध्ये अडथळे आणत नाही. आपल्या सणात इतरांचे अडथळे येऊ लागले आहेत. तसं झालं तर शांत बसू नका. यापुढं कार्यक्रम करून टाकला हे सांगायला माळशिरसहून फोन आला पाहिजे. काय करायचं हे विचारायला फोन करू नका. कार्यक्रम झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवायची जबाबदारी आमची आहे. पोलिसांच्या समोर बोलतो. माझं काही वाकडं करू शकत नाही. आमचा बॉस बसलाय सागर बंगल्यावर. काही होत नाही आम्हाला. आम्ही असेच बोलतो. आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय. कोणाच्या वाकड्यात जाण्यासाठी आलो नाही,’ असं नीतेश राणे म्हणाले.

माळशिरस तहसील कार्यालयातील काही अधिकारी हिंदूंच्या कार्यक्रमावर बंधन घालत असल्याची हिंदू आक्रोश मोर्चाची तक्रार होती. त्या अनुषंगानंही नीतेश राणे बोलले. ‘आम्ही कोणती गाणी वाजवायची हे सांगणारे अधिकारी कोण? असा सवाल त्यांनी केला. ’कोणत्याही अधिकाऱ्यानं आपल्या वाकड्या नजरेनं पाहिलं तर कानाखाली वाजवल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. सरकार तुमच्या बरोबर आहोत. आता त्यांना वाचवायला ठाकरे किंवा पवार येणार नाहीत, असं नीतेश राणे म्हणाले. 'हिंदू म्हणून सर्व जण आपल्या माताभगिणींचं संरक्षण करा, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

Raj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला

'हिरव्या वळवळणाऱ्या जिहाद्यांना सांगतो. जागेवर राहा. जेवढे आहात तेवढेच राहा. उगाच अंगावर आलात तर उरले-सुरले कसे साफ करायचे हे आमच्या धर्मानं सांगून ठेवलंय, असा इशारा त्यांनी कोणचांही नाव न घेता दिला.

नीतेश राणे कोणत्या बॉसबद्दल बोलले?

‘माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय’, असं नीतेश राणे माळशिरसमध्ये बोलताना म्हणाले. 'सागर' बंगला हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईतील निवासस्थान आहे. त्यामुळं फडणवीस हे आपले बॉस आहेत आणि त्यांचा पूर्ण आशीर्वाद आपल्याला आहे असं नीतेश राणे यांना सुचवायचं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या