शिंदे सरकारने मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत नवीन अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द केला. यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन संपवत असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लागणार नाही. मी हे वाक्य सत्ताधाऱ्यांकडून वारंवार ऐकत होते. मात्र अखेर ओबीसींचा विश्वासघात झालाच. कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येतं. त्यामुळे धक्का लागला नाही, असं म्हणणं दिशाभूल करणारं आहे.
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागला आहे. मात्र जे म्हणत आहेत की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं, कसा धक्का लागला नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे की, एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं. लोकांमधील वितुष्ट कमी करावं.